शुबमन गिलने ( Shubman Gill) २०२३ हे वर्ष गाजवले आहे. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये ८ शतकं यंदाच्या वर्षात ठोकली आहेत. इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये त्याची रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी सुरू आहे. त्याने आतापर्यंत ३ शतकं झळकावली आहेत. तेच दुसरीकडे २०१८च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेता कर्णधार पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) क्रिकेटच्या मैदानावरून जवळपास अदृश्य झाला आहे. पृथ्वी व शुबमन हे दोघंही त्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य होते, परंतु एक आपल्या कामगिरीने यशोशिखर गाठतोय, तर दुसरा फॉर्माशी चाचपडतोय. भारताचे माजी क्रिकेटपटू कर्सन घावरी ( Former Indian cricketer Karsan Ghavri) यांनी पृथ्वी शॉवर जोरदार टीका केली आहे.
“२०१८ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघात ही दोघही होती, बरोबर? आज कुठे पृथ्वी शॉ आणि कुठे शुभमन गिल? ते दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आहेत,” असे घावरी यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
“शॉला वाटते की तो एक स्टार आहे आणि त्याला कोणीही हात लावू शकत नाही. त्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर, आपण ट्वेंटी-२०, ५० षटकं किंवा कसोटी सामना किंवा अगदी रणजी ट्रॉफी खेळत असलात तरीही, आपल्याला बाहेर काढण्यासाठी फक्त एक चेंडू लागतो. तुम्हाला शिस्त आणि चांगला स्वभाव हवा आहे. आपल्याला सतत मेहनत करणे आवश्यक आहे. तुम्हाला क्रीजवर कब्जा करणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही तसे केले तर तुम्हाला अधिक धावा मिळतील,” असे ७२ वर्षीय घावरी यांनी सांगितले, कारण पृथ्वी शॉने त्याच्या तंत्रावर आणि तंदुरुस्तीवर काम करावे अशी त्याची इच्छा आहे.
पृथ्वी शॉने यंदाच्या आयपीएलमध्ये ७ इनिंग्जमध्ये फक्त ४७ धावा केल्या आणि तो दोनवेळा भोपळ्यावर बाद झाला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्याला बाकावर बसवणेच योग्य समजले. त्यानंतर त्याला पंजाब किंग्सविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आणि त्यात त्याने अर्धशतक झळकावले. पण, त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध तो पुन्हा एकेरी धावसंख्येवर बाद झाला. तेच दुसरीकडे शुबमन गिलने १६ सामन्यांत ८५१ धावा केल्या आहेत.
Web Title: 'Prithvi Shaw thinks he is a star and nobody can touch him': Former India all-rounder wants Prithvi to learn from Shubman Gill
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.