भारतीय संघात स्थान न मिळाल्याने पृथ्वी शॉ नाराज? दुःखी मनानं केलं मोठं वक्तव्य!

पृथ्वी शॉ गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे, मात्र निवड समिती अद्यापही त्याला टीम इंडियात संधी देण्यास तयार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 12:03 AM2022-11-01T00:03:15+5:302022-11-01T00:05:02+5:30

whatsapp join usJoin us
Prithvi Shaw upset about not getting a place in the Indian team for bangladesh and new zealand tour | भारतीय संघात स्थान न मिळाल्याने पृथ्वी शॉ नाराज? दुःखी मनानं केलं मोठं वक्तव्य!

भारतीय संघात स्थान न मिळाल्याने पृथ्वी शॉ नाराज? दुःखी मनानं केलं मोठं वक्तव्य!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बांगलादेश आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यांसाठी टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मात्र स्टार फलंदाज पृथ्वी शॉलाला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नाही. यामुळे त्याची नाराजी दिसून आली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक मोठी गोष्ट सांगितली आहे. 

दिसून आलं पृथ्वी शॉचं दुःख -
पृथ्वी शॉ गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे, मात्र निवड समिती अद्यापही त्याला टीम इंडियात संधी देण्यास तयार नाही. त्याच्या चमकदार कामगिरीकडे दुर्लक्ष केले जात आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघात स्थान न मिळाल्याने त्याचे दुःख दिसून येत आहे. त्याने साईं बाबा यांच्या प्रतिमेसमोर हात जोडून इमोजीसह लिहिले, 'आशा आहे की साईबाबा तुम्ही सर्व पाहत आहात.' यानंतर आता त्याचे चाहते, त्याची संघात निवड न झाल्यामुळे, त्याच्या या पोस्टकडे पाहत आहेत.

पृथ्वी शॉ भारतीय संघाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने भारतासाठी 5 कसोटी सामन्यात 339 धावा, 6 एकदिवसीय सामन्यात 189 धावा केल्या आहेत. तर एकमेव टी-20 सामन्यात त्याला आपले खातेही उघडता आले नव्हते. याशिवाय, पृथ्वी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. त्याने 63 IPL सामन्यांत 1588 धावा केल्या आहेत. खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियातून बाहेर व्हावे लागले होते.

बांगलादेश टेस्टसाठी संघ असा... - 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (व्हीसी), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

Web Title: Prithvi Shaw upset about not getting a place in the Indian team for bangladesh and new zealand tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.