नवी दिल्ली : पृथ्वी शॉचा संकटाचा काळ सुरू झाला आहे. सलग सहा सामन्यांमध्ये सुपरफ्लॉप ठरल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वीला बाहेरचा रस्ता दाखविला. दिल्ली कॅपिटल्सनेपृथ्वी शॉला ८ कोटींमध्ये घेतले होते. अंतिम एकादश तर दूरच, वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटच्या १६ मध्येही त्याचा समावेश केला नाही.
पृथ्वी शॉ सतत खराब फॉर्मशी झुंजत आहे. गेल्या ६ सामन्यांमध्ये त्याची सर्वोत्तम खेळी १५ धावांची होती. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने ही खेळी केली होती. दोन वेळा खातेही उघडता आले नाही. पृथ्वीची कामगिरी १२, ७, ०, १५, ० आणि १३ अशी झाली.