Join us  

IPL 2021 : प्रियम गर्ग व अभिषेक शर्मामुळे हैदराबाद होणार मजबूत, यंदाचे पर्व सर्वांत रोमांचक होणार

IPL 2021 :

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 6:33 AM

Open in App

- सुनील गावसकर...यांच्या लेखणीतून

आयपीएलचा सुरुवातीचा कालावधी असला तरी सलग दोन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे हैदराबादच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. जय-पराजय खेळाचा भाग असतो, पण ज्यावेळी कुठला संघ जिंकण्याच्या स्थितीत असताना पराभूत होतो त्यावेळी संघात तणावाचे व शंकेचे वातावरण निर्माण होते. सध्या हैदराबाद संघ अशा स्थितीला सामोरे जात आहे. हैदराबाद संघासाठी हे काम सोपे नाही कारण आता त्यांना गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. मुंबईने गेल्या लढतीत कोलकाता संघाला विजयापासून रोखले होते. दडपणाच्या स्थितीत दाखविलेले टेम्परामेंट तुमची ओळख निर्माण करुन देते. ज्यावेळी रन रेट वाढलेला असतो त्यावेळी कथित बिग हिटरचे टेम्परामेंट दिसून येते. प्रथम फलंदाजी करताना मोठे फटके खेळणे लक्ष्याचा पाठलाग करताना असे करण्यापेक्षा सोपे असते. लीगमध्ये आपण एवढ्या वर्षांपासून याचा अनुभव घेत आहोत.कुणा एका खेळाडूसाठी यशस्वी ठरलेली बाब दुसऱ्या खेळाडूसाठी लागू होईलच, असे नाही. कारण प्रत्येक खेळाडूची शरीराची ठेवण, बॅटिंग ग्रिप, बॅट स्पिड वेगवेगळी असते. त्यामुळे हार्दिक पांड्या क्रिजच्या बराच आतमध्ये जातही चेंडूला सीमारेषेपार पोहचवितो. त्यामुळे अन्य फलंदाजही क्रिजचा वापर करीत असे करण्यात यशस्वी ठरतील, असे नाही. ज्याप्रमाणे स्टीव्ह स्मिथ स्टंप सोडून फटके खेळतो आणि खेळाच्या तिन्ही प्रकारात त्याची ही पद्धत यशस्वी ठरली आहे. दुर्दैवाने अनेक फलंदाजांनी हार्दिकची शैली कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात सीमारेषेवर झेल बाद होणाऱ्या फलंदाजांच्या संख्येत मोठी वाढ झाली. कारण फटका मारताना टायमिंग व ताकद याचे योग्य संतुलन त्यांच्याकडे नव्हते. दुसरी पद्धत एक पाय बाजूला सारत मोठे फटके खेळण्यासाठी जागा बनविण्याची आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१सनरायझर्स हैदराबाद