Join us  

टीम इंडियाचे नेतृत्व प्रियम गर्गकडे; जेतेपद कायम राखण्याचे भारतापुढे आव्हान

गेल्या महिन्यात देवधर ट्रॉफी स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या भारत ‘सी’ संघात गर्गने प्रतिनिधित्व केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 5:43 AM

Open in App

मुंबई : उत्तर प्रदेशचा फलंदाज प्रियम गर्ग दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या भारताच्या १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व करेल. अखिल भारतीय ज्युनिअर निवड समितीने रविवारी येथे झालेल्या बैठकीनंतर १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत खेळल्या जाणाºया स्पर्धेसाठी संघाची निवड केली. आघाडीच्या फळीतील फलंदाज गर्गच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक आणि लिस्ट ‘अ‘ सामन्यात शतकाची नोंद आहे. त्याचवेळी, यशस्वी जैस्वाल, अथर्व अंकोलेकर आणि दिव्यांश सक्सेना या मुंबईकरांचीही भारतीय संघात वर्णी लागली आहे.गेल्या महिन्यात देवधर ट्रॉफी स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या भारत ‘सी’ संघात गर्गने प्रतिनिधित्व केले होते. त्याने अंतिम सामन्यात भारत ‘ब’विरुद्ध ७४ धावांची खेळी केली होती. रणजी टचषक २०१८-१९ च्या मोसमात गर्ग उत्तर प्रदेशतर्फे दुसरा सर्वोत्तम धावा फटकावणारा फलंदाज होता. त्याने ६७.८३ च्या सरासरीने ८१४ धावा केल्या. त्यात कारकिर्दीतील सर्वोत्तम २०६ धावांच्या खेळीसह दोन शतकांचा समावेश आहे.लक्ष वेधणाºया अन्य खेळाडूंमध्ये १७ वर्षीय यशस्वी जयस्वाल आहे. जयस्वाल यंदा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करताना लिस्ट ‘अ’ सामन्यात द्विशतकी खेळी करणारा सर्वांत युवा फलंदाज होता. त्याने मोसमात तीन शतके व एक अर्धशतक झळकावताना ११२.८० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे, यंदाच्या १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध ५ बळी घेऊन अथर्वने भारताच्या जेतेपदामध्ये निर्णायक कामगिरी केली होती.विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताचा १९ वर्षांखालील संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. तेथे यजमान देशाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त चौरंगी मालिकेत खेळणार आहे. चौरंगी मालिकेत भारत आणि यजमान देशाव्यतिरिक्त न्यूझीलंड व झिम्बाब्वे या संघांचा समावेश राहील. हैदराबादचा सी. टी. एल. रश्रण दक्षिण आफ्रिका दौरा व चौरंगी मालिकेसाठी संघातील अतिरिक्त खेळाडू राहील. (वृत्तसंस्था)१९ वर्षांखालील विश्वचषक भारतीय संघ :प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव चंद जुरेल (उप-कर्णधार व यष्टिरक्षक), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना. शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), सुशांत मिश्रा आणि विद्याधर पाटील.दक्षिण आफ्रिका दौºयासाठी भारतीय संघ :प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव चंद जेरेल (उप-कर्णधार व यष्टिरक्षक), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), सुशांत मिश्रा, सीटीएल रक्षण आणि विद्याधर पाटील.ही १३ वी युवा विश्वचषक स्पर्धा असून १६ संघ जेतेपदासाठी भिडतील. त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताचा ‘अ’ गटात प्रथमच पात्रता मिळवणारा जपान, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघांसह समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर लीगसाठी पात्र ठरतील.भारत या स्पर्धेतील सर्वांत यशस्वी संघ आहे. भारताने २०१८ च्या गेल्या स्पर्धेसह एकूण चारवेळा जेतेपद पटकावले आहे. भारताने २०१८ मध्ये एकही सामना न गमावता अंतिम फेरीत आॅस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला होता.

टॅग्स :आयसीसी