Join us  

Pro Kabaddi : सिद्धार्थ देसाईचा पगार पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याच्यापेक्षाही अधिक; विश्वास बसत नाही ना? 

प्रो कबड्डी लागच्या ( Pro Kabaddi League 2021)  ८व्या पर्वाला २२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहेत आणि १२ संघ कोर्टवर उतरणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 12:05 PM

Open in App

प्रो कबड्डी लागच्या ( Pro Kabaddi League 2021)  ८व्या पर्वाला २२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहेत आणि १२ संघ कोर्टवर उतरणार आहेत. काही दिवसांपूर्वीच लीगसाठी खेळाडूंचा लिलाव झाला. यामध्ये चढाईपटू प्रदीप नरवाल ( Pradeep Narwal) याला यूपी योद्धानं १.६५ कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. तेलुगू टायटन्सनं १.३० कोटींत महाराष्ट्राच्या सिद्धार्थ देसाईला आपल्या ताफ्यात घेतले. या दोघांचाही पगार हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याला  पाकिस्तान सुपर लीगमध्ये मिळणाऱ्या पगारापेक्षा अधिक आहे. हे जाणून चाहतेही हैराण झाले आहेत.

सिद्धार्थ देसाईकडेनं प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वात रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. यू मुंबा संघाकडून खेळताना त्यानं चढाईचे सर्वात जलद २०० गुण कमावण्याचा विक्रम केला. त्या पर्वात त्यानं २१ सामन्यांत २१८ गुण कमावले. शिवाय सर्वात जलद ५० गुणांचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.  त्यानंतर ७व्या पर्वात त्याच्यासाठी तेलुगू टायटन्सनं १.४५ कोटी मोजले. त्या पर्वा त्यानं २२ सामन्यांत २२० गुण ( २१७ चढाई व ३ पकड) कमावले.  

प्रदीप नरवाल हा PKL मधील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्यानं एकूण ११६९ गुण कमावले आहेत. चढाईत त्यानं सर्वाधिक ११६० गुण कमावले आहेत. त्याच्या ८८० चढाई यशस्वी ठरल्या आहेत आणि ५३ वेळा त्यानं सुपर रेड केल्या आहेत. ५९ सामन्यांत त्यानं सुपर १० गुण घेतले आहेत. 

बाबर आजम पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची सुपर किंग्सकडून खेळतो. मागील पर्वात त्याला खेळाडूंच्या ड्राफ्टमध्ये प्लॅटिनम कॅटेगरीत ठेवले गेले होते. तेव्हा त्याला सर्वाधिक १य७ लाख डॉलर म्हणजेच १.२४ कोटी पगार दिला गेला होता. कराची किंग्सनं या पर्वासाठी बाबरची कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. २०१४मध्ये सुरुवात झालेल्या पो कबड्डीचे सात  पर्व झाले आहेत. पहिल्या पर्वात जयपूर पिंक पँथर्सनं जेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१५मध्ये यू मुम्बाने तर पुढील तीन पर्वात पाटना पायरेट्सनं जेतेपदं पटकावली. २०१८ व २०१९मध्ये अनुक्रमे बंगलोर बुल्स व बंगाल वॉरियर्स यांनी बाजी मारली.   

टॅग्स :बाबर आजमप्रो-कबड्डीप्रो कबड्डी लीग
Open in App