IPL साठी CSK सज्ज! जाणून घ्या संभाव्य प्लेइंग XI, ३ मराठमोळ्या खेळाडूंवर मोठी जबाबदारी

IPL 2024: आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 01:57 PM2024-03-06T13:57:42+5:302024-03-06T13:59:25+5:30

whatsapp join usJoin us
probable playing XI of MS Dhoni's Chennai Super Kings team for IPL 2024 has been decided and Ajinkya Rahane and Ruturaj Gaikwad will have a big responsibility  | IPL साठी CSK सज्ज! जाणून घ्या संभाव्य प्लेइंग XI, ३ मराठमोळ्या खेळाडूंवर मोठी जबाबदारी

IPL साठी CSK सज्ज! जाणून घ्या संभाव्य प्लेइंग XI, ३ मराठमोळ्या खेळाडूंवर मोठी जबाबदारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Chennai Super Kings Team: आयपीएलचा सतरावा हंगाम सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. २२ मार्चपासून आयपीएलच्या आगामी हंगामाला सुरूवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. अशातच आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन समोर आली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात पुन्हा एकदा चेन्नईचा संघ मैदानात असणार आहे. 

दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ची तारीख जाहीर झाली आहे. यंदा आयपीएलनंतर लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे, शिवाय लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल नेमकी कुठे खेळवायची हाही प्रश्न होता. पण, याचे उत्तर मिळाले आहे. आयपीएल २०२४ ला २२ मार्चपासून सुरू होणार आहे आणि पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांनंतर पुढील वेळापत्रक जाहीर केले जाईल. 

CSK च्या डेव्हिन कॉनवेवर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे तो आयपीएलच्या आगामी हंगामाला मुकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड आणि न्यूझीलंडचा स्टार रचिन रवींद्र यांच्यावर चेन्नईच्या सलामीची जबाबदारी असेल. तिसऱ्या क्रमांकावर मराठमोळा अजिंक्य रहाणे असेल. तर मधल्या फळीतील फलंदाजीची धुरा कर्णधार धोनी डेरिल मिचेल, शिवम दुबे, मोईन अली, आणि जडेजा यांच्याकडे असणार आहे. रहाणे, ऋतुराज आणि शार्दुल ठाकूर हे तीन मराठमोळे चेहरे चेन्नईच्या संघात आहेत. 

चेन्नईची संभाव्य प्लेइंग XI
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मोईन अली, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, महेश तीक्ष्णा. 

आयपीएल २०२४ चे वेळापत्रक 

  • २२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  • २३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
  • २३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
  • २४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
  • २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  • २५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  • २६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  • २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  • २८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
  • २९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  • ३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
  • ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
  • ३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  • १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
  • २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  • ३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  • ४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  • ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
  • ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
  • ७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ

Web Title: probable playing XI of MS Dhoni's Chennai Super Kings team for IPL 2024 has been decided and Ajinkya Rahane and Ruturaj Gaikwad will have a big responsibility 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.