Promo of IPL 2022, MS Dhoni : ये अब नॉरमल है!, बस ड्रायव्हरच्या रुपात दिसला महेंद्रसिंग धोनी; आयपीएलचा भन्नाट प्रोमो रिलीज 

क्रिकेट चाहत्यांना ज्याची उत्सुकता होती, ती आयपीएल २०२२ स्पर्धा यंदा भारतातच होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 12:33 PM2022-03-04T12:33:28+5:302022-03-04T12:33:51+5:30

whatsapp join usJoin us
Promo of IPL 2022 : YehAbNormalHai – MS Dhoni turns swaggy bus driver in new IPL 2022 advertisement, Watch video  | Promo of IPL 2022, MS Dhoni : ये अब नॉरमल है!, बस ड्रायव्हरच्या रुपात दिसला महेंद्रसिंग धोनी; आयपीएलचा भन्नाट प्रोमो रिलीज 

Promo of IPL 2022, MS Dhoni : ये अब नॉरमल है!, बस ड्रायव्हरच्या रुपात दिसला महेंद्रसिंग धोनी; आयपीएलचा भन्नाट प्रोमो रिलीज 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्रिकेट चाहत्यांना ज्याची उत्सुकता होती, ती आयपीएल २०२२ स्पर्धा यंदा भारतातच होणार आहे. २६ मार्च ते २९ मे या कालावधीत होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या साखळी फेरीतील सामने महाराष्ट्रात खेळवण्याचा निर्णय झाला आहे. शुक्रवारी आयपीएलने त्यांचा प्रोमो रिलीज केला. त्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) बस ड्रायव्हरच्या रुपात दिसत आहे.
या प्रोमोत धोनी बस चालवताना दिसतोय.. मागे गाड्यांचा ताफा असताना तो अचानक ब्रेक मारून बस थांबवतो आणि त्यानंतर वाहतुक पोलिसही त्याला जाब विचारतात.. मग पुढे काय होतं ते पाहा..  


 आयपीएल २०२२चे साखळी फेरीतील ५५ सामने मुंबईत, तर १५ सामने पुण्यात खेळवण्यात येणार आहेत. ५५ सामने वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डी वाय पाटील स्टेडियम येथे खेळवण्यात येतील, तर पुण्याच्या स्टेडियमवर १५ सामने होणार आहेत. २६ मार्च ते २९ मे या कालावधीत आयपीएल २०२२ खेळवण्यात येणार आहे.

लखनौ व अहमदाबाद या दोन नव्या फ्रँचायझी दाखल झाल्यामुळे १० संघांमध्ये यंदाची आयपीएल होणार आहे. १० संघांची प्रत्येकी पाच अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम व डी वाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी २०, तर ब्रेबॉर्न स्टेडियम व पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर प्रत्येकी १५ सामने खेळवण्यात येतील.

१० संघा साखळी फेरीत प्रत्येकी १४ सामने खेळतील. त्यापैकी ७ होम व ७ अवे असा फॉरमॅट असेल. साखळी फेरीत एकूण ७० सामने होतील आणि त्यानंतर ४ प्ले ऑफचे सामने. प्रत्येक संघ एकमेकांशी दोन आणि चार संघांशी प्रत्येकी एक असे सामने खेळतील.

ग्रुप अ -  मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स

ग्रुप ब - चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स
 

Web Title: Promo of IPL 2022 : YehAbNormalHai – MS Dhoni turns swaggy bus driver in new IPL 2022 advertisement, Watch video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.