सिडनी : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने रविवारी रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारख्या खेळाडूंशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकणे खूप विशेष असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. कोहलीने स्फोटक फलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्या याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पांड्याने २२ चेंडूत ४२ धावांची नाबाद खेळी करीत भारताला सहा विकेट राखून विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी खेळवला जाणार आहे.
कोहली सामन्यानंतर म्हणाला, ‘हा विजय खूप विशेष आहे. टी २० क्रिकेटमध्ये आम्ही एक संघ म्हणून खेळलो. संघात रोहित आणि बुमराहसारखे मर्यादित षटकातील अनुभवी तज्ज्ञ खेळाडू नव्हते, तरीदेखील आम्ही भरीव कामगिरी करीत आहोत. त्याचा मला आनंद असून संघाचा अभिमान वाटतोय. रोहित दुखापतीमुळे संघात नाही तसेच बुमराहला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर विश्रांती देण्यात आली. कोहलीने पांड्याची प्रशंसा केली. तो म्हणाला, ‘पांड्या २०१६ मध्ये आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संघात आला. तो प्रतिभावान आहे.’
Web Title: Proud to win series without Rohit, Bumrah: Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.