ऑस्ट्रेलियाविरूद्ध 2013-14 च्या एशेज मालिकेतील मानहानिकारक पराभवानंतर इंग्लंड संघातून डच्चू मिळालेला माजी कर्णधार केविन पीटरसनने अखेर क्रिकेटच्या मैदानाला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर स्वतःच्या मुलाच्या फोटोसह भावूक पोस्ट शेअर करून त्याने निवृत्ती घेण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तान सुपर लीगनंतर (पीएसएल) क्रिकेटमधून पीटरसन संन्यास घेणार आहे. उद्यापासून दुबईमध्ये पीएसएलच्या तीस-या पर्वाची सुरूवात होत आहे. दुबईला रवाना होण्य़ापूर्वी त्याने पत्नी आणि मुलाच्या नावे भावूक पोस्ट शेअर केली आहे. या वर्षीच्या सुरूवातीलाच पीटरसनने संन्यास घेण्याचे संकेत दिले होते. पीटरसनने पीएसएलच्या पहिल्या दोन सत्रात क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
2005 मध्ये आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात करणा-या पीटरसनने इंग्लंडसाठी 104 कसोटी, 136 वनडे आणि 37 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी कारकिर्दीत त्याने 23 शतक आणि 35 अर्धशतकांच्या सहाय्याने 8 हजार 181 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये 9 शतक आणि 25 अर्धशतक झळकावताना त्याने 4 हजार 440 धावा केल्या आहेत. तर 37 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 7 अर्धशतकं फटकावताना 1 हजार 176 धावा केल्या.
काय आहे पीटरसनची इन्स्टाग्राम पोस्ट -
'जेसिका टेलर आणि माझ्या मुलांना एक क्रिकेटपटू म्हणून शेवटचा गुडबाय, मला गुडबाय म्हणायला कधीच आवडत नाही, पण हे शेवटचं. हा प्रवास आणि क्रिकेट माझ्यासाठी शानदार होतं.
Web Title: PSL 2018 to be Kevin Pietersen's last professional stint
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.