PSL 2022 : ६ चेंडूंत हव्या होत्या १६ धावा, मुल्तानचा 'शाह' आला अन् ४ चेंडूंत सामना संपवला; आफ्रिदीच्या संघाला शॉक लगा...

पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL 2022) शनिवारी रोमहर्षक सामना झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 08:16 PM2022-01-29T20:16:54+5:302022-01-29T20:26:41+5:30

whatsapp join usJoin us
PSL 2022 : Multan Sultan need 16 runs from the final over then Khushdil Shah on the strike - 4,4,4,6 and finished the match for Multan with Haris Rauf bowling the final over  | PSL 2022 : ६ चेंडूंत हव्या होत्या १६ धावा, मुल्तानचा 'शाह' आला अन् ४ चेंडूंत सामना संपवला; आफ्रिदीच्या संघाला शॉक लगा...

PSL 2022 : ६ चेंडूंत हव्या होत्या १६ धावा, मुल्तानचा 'शाह' आला अन् ४ चेंडूंत सामना संपवला; आफ्रिदीच्या संघाला शॉक लगा...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL 2022) शनिवारी रोमहर्षक सामना झाला. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुल्तान सुल्तान (Multan Sultans) संघानं २०७ धावांचे लक्ष्य २ चेंडू व ५ विकेट्स राखून पार करताना लाहोर कलंदर्सला ( Lahore Qalandars) मोठा धक्का दिला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्याचा खुशदील शाह ( Khushdil Shah) हा नायक ठरला अन् त्यानं चार चेंडूंत सामना फिरवताना कलंदर्सचा कर्णधार शाहिन शाह आफ्रिदी ( Shaheen Shah Afridi) याला जबरदस्त शॉक दिला.

प्रथम फलंदाजी करताना कलंदर्स संघानं ५ बाद २०६ धावा केल्या. फाखर जमाननं ३५ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली. कामरान घुलामनं ३१ चेंडूंत ४३ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त अब्दुल्लाह शफिक (२४), मोहम्मद हाफिज ( १६), राशिद खान ( १७) यांनी धावसंख्येत हातभार लावला. प्रत्युत्तरात सुल्तानच्या शान मसूद व कर्णधार रिझवान यांनी अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी केली. पण, राशिद खाननं ही भागीदारी संपुष्टात आणली. मसूद ५० चेंडूंत १४ चौकार व १ षटकार खेचून ८३ धावांवर माघारी परतला. दोन षटकानंतर रिझवानला ( ६९) आफ्रिदीनं त्रिफळाचीत केलं. 

इथे सामना रंगतदार अवस्थेत गेला. रिली रोसोवू ( ५) व टीम डेव्हिड ( १) हे लगेच माघारी फिरली. सोहैब मक्सूद खिंड लढवत होता, परंतु १९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडवूर आफ्रिदीनं मक्सूदला ( २०) बाद केले. आफ्रिदीनं ३ विकेट्स घेत कलंदर्सच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. हॅरीस रौफ २०वे षटक फेकण्यासाठी आला अन् स्ट्राईकवर खुशदील शाह होता. सुल्तानला ६ चेंडूंत १६ धावांची गरज असताना ४, ४, ४, ६ असा चार चेंडूत सामना संपवला. 

Web Title: PSL 2022 : Multan Sultan need 16 runs from the final over then Khushdil Shah on the strike - 4,4,4,6 and finished the match for Multan with Haris Rauf bowling the final over 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.