They caught each other; PSL 2022: पाकिस्तानी क्रिकेटपटूंची फिल्डींग आणि त्यांचे गमतीदार किस्से अनेकदा ऐकले व पाहिलेही असतील. त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्स विरुद्ध पेशावर झाल्मी यांच्यातल्या लढतीत घडलेल्या या प्रसंगाची जगभरात चर्चा आहे आणि सारे लोटपोट झाले आहेत. लाहोर करंदर्स संघानं २९ धावांनी हा सामना जिंकला, परंतु २०० धावांचा बचाव करताना त्यांच्या खेळाडूंनी अनेक झेल सोडले.
धावांचा पाठलाग करणाऱ्या पेशावर संघाच्या डावातील ११ व्या षटकात हैदर अलीनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु कामरान घुलामच्या गोलंदाजीवर मारलेला फटका चुकीच्या दिशेनं गेला. तो झेल टिपण्यासाठी मोहम्मद हाफिज व फाखर जमान हे दोघंही धावले आणि दोघांमधील संवादाच्या अभावामुळे हा झेल सुटला. दोघांनी चेंडू पकडण्याऐवजी एकमेकांचा हात पकडला. जीवदान मिळालेल्या अलीने ३४ चेंडूंत ४९ धावांची खेळी केली, परंतु पेशावर संघाला २० षटकांत ९ बाद १७० धावाच करता आल्या. त्यांचा या लीगमधील हा दुसरा पराभव ठरला.
पाहा व्हिडीओ..
लाहोरने तीनपैकी दोन सामने जिंकून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. मुल्तान सुल्तान संघाने चारही सामने जिंकून अव्वल स्थान कायम राखले आहे.
Web Title: PSL 2022: "They caught each other," Fakhar and Hafeez drop an easy catch after collision, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.