Erin Hollande Danny Morrison, PSL Video: भरमैदानात त्याने तिला उचललं... गरागरा फिरवलं... ; पाकिस्तानात काहीही होऊ शकतं!

ती बोलत असताना तो अचानकच तिच्याजवळ गेला, मग जे झालं त्याने साऱ्यांनाच धक्का बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 09:20 PM2023-03-06T21:20:24+5:302023-03-06T21:21:08+5:30

whatsapp join usJoin us
PSL 2023 Danny Morrison lifts Ben Cutting wife Erin Hollande during live coverage gets trolled on social media watch video | Erin Hollande Danny Morrison, PSL Video: भरमैदानात त्याने तिला उचललं... गरागरा फिरवलं... ; पाकिस्तानात काहीही होऊ शकतं!

Erin Hollande Danny Morrison, PSL Video: भरमैदानात त्याने तिला उचललं... गरागरा फिरवलं... ; पाकिस्तानात काहीही होऊ शकतं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Erin Hollande Danny Morrison, PSL Video: पाकिस्तान सुपर लीगच्या आठव्या हंगामाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. चालू हंगामातील २१ सामने पार पडले आहेत. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बेन कटिंगची पत्नी एरिन हॉलंड आणि न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर डॅनी मॉरिसन आपली कॉमेंट्री करत लोकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. पण नुकताच मॉरिसन आणि हॉलंडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डॅनी मॉरिसन एरिन हॉलंडशी संवाद साधत असताना अचानक असे कृत्य करतो की क्षणभर सगळेच थक्क होतात.

खरं तर, संभाषणादरम्यान मॉरिसन अचानक एरिन हॉलंडच्या जवळ येतो. ती बोलत असते, त्यामुळे तिला या सगळ्याची काहीच कल्पना नसते. ती अतिशय शांतपणे सामन्याबद्दलच्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असते. बोलता बोलता अचानक डॅनी मॉरिसन पुढे येतो नी थोडासा वाकून एरिन हॉलंड लहान मुलीसारखं पटकन उचलून घेतो. इतकंच नव्हे तर तो तिला आपल्या कडेवर घेतल्यासारखे करतो नि चक्क गरागरा फिरवून मग पुन्हा जमिनीवर ठेवतो. घडलेला प्रकार इतका पटकन होतो की कुणालाच काही कळत नाही. पण मॉरिसनच्या या अचानक केलेल्या कृत्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हॉलंडने स्वत: हा व्हिडिओ शेअर केला आहे-

एरिन हॉलंडने या क्षणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हॉलंड आणि मॉरिसन एकत्र बोलताना दिसत आहेत. दरम्यान, मॉरिसन अचानक त्याच्याकडे तिला उचलून फिरवतो. या व्हिडीओसोबत हॉलंडने मॉरिसनला थँक्यू अंकल म्हणत त्याला कोपरखळीही मारली आहे.

दरम्यान, मॉरिसनने चीअरलीडरसोबतही असे कृत्य केले होते. माजी किवी क्रिकेटपटू आणि समालोचक डॅनी मॉरिसनने यापूर्वी असे कृत्य केले आहे. खरं तर, भारताच्या प्रसिद्ध देशांतर्गत क्रिकेट लीग IPL मध्ये, त्याने चीअरलीडरला आपल्या मांडीवर उचलले होते.  त्यानंतर बराच गदारोळ झाला होता.

Web Title: PSL 2023 Danny Morrison lifts Ben Cutting wife Erin Hollande during live coverage gets trolled on social media watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.