Tim David - ६,६,६,६,६,६...! RCBच्या माजी फलंदाजानं पाकिस्तानच्या गोलंदाजांची केली वाईट अवस्था; १२ चेंडूंत कुटल्या ६० धावा, Video 

PSL 7 : Tim David - इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२१च्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) कडून खेळून इतिहास घडवणाऱ्या सिंगापूरच्या टीम डेव्हिडनं मंगळवारी पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) धुरळा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 09:11 AM2022-02-02T09:11:35+5:302022-02-02T09:12:31+5:30

whatsapp join usJoin us
PSL 7 : Tim David scored 71 runs from just 29 balls including 6 fours and 6 sixes at a strike rate of 244.83, Watch Video | Tim David - ६,६,६,६,६,६...! RCBच्या माजी फलंदाजानं पाकिस्तानच्या गोलंदाजांची केली वाईट अवस्था; १२ चेंडूंत कुटल्या ६० धावा, Video 

Tim David - ६,६,६,६,६,६...! RCBच्या माजी फलंदाजानं पाकिस्तानच्या गोलंदाजांची केली वाईट अवस्था; १२ चेंडूंत कुटल्या ६० धावा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PSL 7 : Tim David - इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२१च्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) कडून खेळून इतिहास घडवणाऱ्या सिंगापूरच्या टीम डेव्हिडनं मंगळवारी पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) धुरळा केला. आयपीएलमध्ये खेळणारा पहिल्या सिंगापूरचा खेळाडू ठरलेल्या डेव्हिडनं PSL मध्ये मुल्तान सुल्तान संघाला काल संकटातून बाहेर काढले. ३ बाद ७८ अशी संघाची धावसंख्या असताना डेव्हिड मैदानावर आला अन् इस्लामाबाद युनायटेडच्या गोलंदाजांना धु धु धुऊन गेला... त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर मुल्ताननं २० षटकांत ५ बाद २१७ धावांचा डोंगर उभा केला आणि नंतर २० धावांनी सामना जिंकलाही.

प्रथम फलंदाजी करताना मुल्तान संघाला शान मसूदने चांगली सुरूवात करून दिली. कर्णधार मोहम्मद रिझवान ( १२) दुर्दैवीरित्या धावबाद झाला, तर सोहैब मक्सूदनही ( १३) धावबाद होऊन माघारी परतला. मसूदने ३१ चेंडूंत ४३ धावा केल्या. मुल्तानचे आघाडीचे तीन फलंदाज १०.२ षटकांत ७८ धावांवर माघारी परतले होते. त्यानंतर रिली रोसोव व टीम डेव्हिड यांनी चौथ्या विकेटसाठी ९ षटकांत ११० धावा जोडल्या. टीम डेव्हिडनं २४४.८२च्या स्ट्राईक रेटने २९ चेंडूंत ७८ धावा चोपल्या. त्यापैकी ६० धावा ( ६ चौकार व ६ षटकार)  या अवघ्या १२ चेंडूंत आल्या. रोसोव ३५ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांच्या मदतीनं ६७ धावांवर नाबाद राहिला.




इस्लामाबाद युनायटेडनं विजयासाठी सारे प्रयत्न केले. सलामीचे फलंदाज पॉल स्टीर्लिंग ( १९), अॅलेक्स हेल्स ( २३) आणि रहमदुल्लाह गुरबाज ( १५) हे झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार शादाब खाननं तुफान फटकेबाजी केली. पण, अन्य फलंदाजांकडून त्याला साथ मिळाली नाही. शादाबने ४२ चेंडूंत ५ चौकार व ९ षटकारांसह ९१ धावांची  वादळी खेळी केली. पण, इस्लामाबाद संघाला १९.४ षटकांत १९७ धावांपर्यंतच मजल मारता आली. खुशदील शाहनं सर्वाधिक ४, तर डेव्हिड विलीनं तीन विकेट्स घेतल्या. 

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू, पण खेळतो सिंगापूरसाठी, कोण आहे टीम डेव्हिड?
डेव्हिड हा मुळचा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व करतो. आयसीसीनं १०६ सदस्य देशांना ट्वेंटी-२०तील आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे. ६ फुटांच्या डेव्हिडनं १५८पेक्षा अधिक स्ट्राईक रेटनं १४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ५५८ धावा केल्या आहेत. त्यानं एकूण ४९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत आणि त्यात बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग मधील सामन्यांचा समावेश आहे. त्यात त्यानं ११७१ धावा केल्या आहेत.  
 

Web Title: PSL 7 : Tim David scored 71 runs from just 29 balls including 6 fours and 6 sixes at a strike rate of 244.83, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.