कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आलेली पाकिस्तान सुपर लीग जूनमध्ये पुन्हा खेळवण्यात येणार आहे. या लीगसाठी परदेशी खेळाडूंच्या बदली खेळाडूंची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल याच्यासह अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यात सुरू झालेली ही स्पर्धा पहिल्या टप्प्यानंतर स्थगित करण्यात आली होती आणि आता लीगचा दुसरा टप्पा १ जूनपासून सुरू होणार आहे.
जगातील ट्वेंटी-२० खेळाडूंमध्ये तिसरा सर्वोत्तम खेळाडू असलेला वेस्ट इंडिजचा अष्टपैलू रसेल क्यूएत्ता ग्लॅडिएटर्स ( Quetta Gladiators) संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. इंग्लंडचा टॉम बँटन याला त्यानं रिप्लेस केलं आहे. रिल्पेसमेंट ड्राफ्टमध्ये १९ खेळाडूंची निवड झाली आहे. पेशावर झाल्मी, ग्लॅडिएटर्स आणि इस्लामाबाद युनायटेड यांना आणखी एका खेळाडूची निवड करायची आहे आणि त्यांनी हा निर्णय राखून ठेवला आहे.
बांगलादेशचा शाकिब अल हसन याला लाहोर कलंदर्स, न्यूझीलंडचा मार्टीन गुप्तील याला कराची किंग्स आणि ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा याला इस्लामाबाद यांनी करारबद्ध केलं आहे.
FULL LIST OF PSL 2021 REPLACEMENT DRAFT PICKS
- इस्लामाबाद युनायटेड ( Islamabad United) - उस्मान ख्वाजा ( अॅलेक्स हेल्स), जॅनेमन मलान ( लुईसल ग्रेगोरी)
- कराची किंग्स ( Karachi Kings) - मार्टीन गुप्तील ( कॉलीन इंग्राम), थिसारा परेरा ( मोहम्मद नबी), नजीबुल्लाह झाद्रान ( डॅन ख्रिस्टीयन), लिटन दास ( जो क्लार्क)
- लाहोर कलंदर्स ( Lahore Qalandars) - शाकिब अल हसन ( राशिद खान), जेम्स फॉल्कनर ( डेव्हिड वीज), जो बर्न्स ( समित पटेल), कॅलम फर्ग्युसन ( टॉम अॅबेल), सीक्कूग प्रसन्ना ( जोए डेन्ली)
- मुल्तान सुल्तान ( Multan Sultans) - महमुदुल्लाह ( ख्रिस लीन), रहमनुल्लाह गुर्बाज ( जेम्स व्हिन्सी), जॉर्ज लिंडे ( अॅडम लिथ), ओबेड मॅकॉय ( कार्लोस ब्रेथवेट)
- पेशावर झाल्मी ( Peshawar Zalmi) - फॅबीयन अॅलन ( मुजीब उर रहमान), रोवमन पॉवेल ( लायम लिव्हिंगस्टोन), फिडेल एडवर्ड्स ( साकिब महमूद)
- क्यूएत्ता ग्लॅडिएटर्स ( Quetta Gladiators) - आंद्रे रसेल ( टॉम बँटन)
Web Title: PSL confirm replacement draft as Andre Russell leads names joining competition in June
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.