वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीनं इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल ) सनरायझर्स हैदराबाद संघातील सहकारी 'कालू' असे बोलवायचे, असा दावा केला होता. यावरून वर्णद्वेषाचा मुद्दा क्रिकेट विश्वातही उपस्थित झाला होता. पण, आता यात पाकिस्तान सुपर लीगमधील (पीएसएल) पेशावर झाल्मी संघाचे मालक जावेद आफ्रिदी यांनी उडी घेतली. सॅमीसह वेस्ट इंडिजच्या सर्व खेळाडूंना पाकिस्तानात राजासारखी वागणूक मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
जॉर्ज फ्लॉयड याच्या निधनानंतर जगभरात कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात वाचा फुटली. अमेरिकेत निर्दशनं झाली. अनेक क्रीडापटूंनीही वर्णद्वेषाच्या मुद्द्यावर निषेध व्यक्त केला. वेस्ट इंडिजचे खेळाडू सॅमी, ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो यांनीही निषेध व्यक्त करताना, त्यांनाही अशाच प्रसंगांना सामोरे जावे लागल्याचा दावा केला. हे तिघेही पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतात.
पेशावर झाल्मी संघाचे मालक जावेद आफ्रिदी यांनी सांगितले की,''सॅमीसह वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना पाकिस्तानात राजासारखी वागणूक दिली जाते. त्यांना आम्ही मॅच विनर मानतो. त्यांना खेळताना पाहणे, पाकिस्तानी चाहत्यांना आवडते. ते त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात. सॅमीला आमच्या संघात नायकासारखी वागणूक दिली जाते.''
दरम्यान, सॅमीनं गुरुवारी त्यानं केलेल्या आरोपावरून माघार घेतली. सॅमीनं ट्विट केलं की,''या संदर्भात मी एका व्यक्तीशी सकारात्मक चर्चा केली आणि त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं आहे. नकारात्मकता पसरवण्यापेक्षा लोकांना सुशिक्षित करण्यावर भर द्यायला हवा. प्रेमानं कालू म्हणत असल्याचं त्यानं मला सांगितलं आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे.''
डॅरेन सॅमीला पाकिस्तानी नागरिकत्व देण्याची शिफारसडॅरेन सॅमीला पाकिस्तानचं नागरिकत्व मिळावं म्हणून पाकिस्तान सूपर लीगमध्ये तो प्रतिनिधित्व करत असेल्या पेशावर झाल्मी संघाकडून अर्ज करण्यात आला आहे. डॅरेन पाकिस्तान सूपर लीगमध्ये पेशावर झाल्मी संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. पेशावर झाल्मी संघाचे मालक जावेद आफ्रिदी यांनी सॅमीला पाकिस्तानी नागरिकत्व मिळावं यासाठी अर्ज केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ते म्हणाले,''डॅरेन सॅमीला पाकिस्तानचे नागरिकत्व मिळावं, यासाठी आम्ही विनंती करत आहोत. त्यासाठीचा अर्ज सध्या राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षानीही यासाठी आपला शब्द टाकावा, अशी विनंती मी त्यांना करतो. पाकिस्तान सुपर लीगच्या दुसऱ्या मोसमात लाहोर येथे सॅमीनं या देशाप्रती प्रेम व्यक्त केलं होतं.''
डॅरेन सॅमीच्या वादात स्वरा भास्करची उडी; म्हणते, सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी माफी मागावी!
भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषाचे आरोप करणाऱ्या डॅरेन सॅमीची माघार; 'कालू'चा अर्थ उमगला
आता Wide बॉलवर मिळणार फ्री हिट; ट्वेंटी-20 सामन्यात दोन पॉवर प्ले!
BCCI पैशांसाठी IPL 2020च्या आयोजनाचा हट्ट करतेय का? खजिनदार अरुण धुमाल म्हणतात...