स्टुअर्ट ब्रॉडला मिळाली वाईट बातमी; त्याच्या पबला भीषण आग, संपूर्ण इमारत झाली खाक! 

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरी कसोटी सुरू असताना गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला वाईट बातमी मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 05:05 PM2022-06-12T17:05:56+5:302022-06-12T17:07:10+5:30

whatsapp join usJoin us
Pub Co-Owned by England Seamer Stuart Broad Ravaged by Fire, pacer says 'it hurts right now' | स्टुअर्ट ब्रॉडला मिळाली वाईट बातमी; त्याच्या पबला भीषण आग, संपूर्ण इमारत झाली खाक! 

स्टुअर्ट ब्रॉडला मिळाली वाईट बातमी; त्याच्या पबला भीषण आग, संपूर्ण इमारत झाली खाक! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pub co-owned by Stuart Broad destroyed in major fire: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरी कसोटी सुरू असताना गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला वाईट बातमी मिळाली आहे. ब्रॉडचा मालकी हक्क असलेल्या पबला भीषण आग लागली असून त्यात संपूर्ण इमारत खाक झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

ब्रॉड सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्या कसोटीत खेळतोय. नॉटिंघमशायर आणि लेहस्टरशरा बॉर्डरच्या मधोमध असलेल्या ब्राउगटन येथे ब्रॉडचा हा पब होता. ११ जूनला सकाळी त्याच्या पबला ही आग लागली आणि अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी ब्रॉडला खूप नुकसान सोसावे लागले आहे. ब्रॉडने स्वतः ट्विट करून ही माहिती दिली.

या आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. ब्रॉड म्हणाला, ''मला आज सकाळी मिळालेल्या वृत्तावर विश्वास बसत नाही. आमच्या सुंदर पबला आज सकाळी आग लागली. नशीबाने यात कोणाचाही जीव गेलेला नाही. नॉटिंघमशायर फायर सर्व्हिसने उत्तम काम केले. येथील गावकऱ्यांचेही आभार. या घटनेने मी दुःखी झाला आहे, परंतु आम्ही पुन्हा उभे राहू.'' 


Web Title: Pub Co-Owned by England Seamer Stuart Broad Ravaged by Fire, pacer says 'it hurts right now'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.