Join us  

पुजारा दुस-या स्थानी, आयसीसी क्रमवारी, विराट कोहली पाचव्या क्रमांकावर

भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने दोन स्थानांची प्रगती करताना आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसºया स्थानी दाखल झाला आहे. कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 2:02 AM

Open in App

दुबई : भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने दोन स्थानांची प्रगती करताना आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसºया स्थानी दाखल झाला आहे. कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी आहे. श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात १४३ धावांची खेळी करणारा पुजारा दुसºया स्थानावर पोहोचला आहे.यापूर्वी पुजाराने मार्च महिन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध रांची कसोटीत मानांकनामध्ये प्रगती केली होती. त्यानंतर आॅगस्ट महिन्यात श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीमध्ये त्याने पुन्हा एकदा ते स्थान गाठले होते.आॅस्ट्रेलियाला पहिल्या अ‍ॅशेस कसोटीत विजय मिळवून देणारा कर्णधार स्टीव्ह स्मिथ ९४१ मानांकन गुणांसह अव्वल स्थानी आहे. स्मिथ सर्वाधिक मानांकन गुणांची नोंद करणाºया कसोटी फलंदाजांच्या यादीमध्ये सर डॉन ब्रॅडमन (९६१), लेन हटन (९४५), जॅक हॉब्स (९४२) आणि रिकी पाँटिंग (९४२) यांच्यानंतर पीटर मेसोबत (९४१) संयुक्तपणे पाचव्या स्थानी आहे.इंग्लंडचा कर्णधार जो रुट तिसºया व न्यूझीलंडचा केन विल्यम्सन चौथ्या स्थानी आहे तर आॅस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर सहाव्या स्थानी आहे.भारताचा सलामीवीर मुरली विजयने आठ स्थानांची प्रगती करताना २८ वे स्थान पटकावले आहे, तर रोहित शर्माने सात स्थानांची प्रगती करताना ४६ वे स्थान गाठले आहे.भारताच्या के. एल. राहुलची एका स्थानाने घसरण झाली असून, तो नवव्या स्थानी आहे. अजिंक्य रहाणेला दोन स्थानांचे नुकसान झाले असून तो १५ व्या स्थानी आहे. श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्नेची एका स्थानाने घसरण झाली असून, तो १८ व्या तर भारताचा शिखर धवन २९ व्या स्थानी आहे.गोलंदाजांच्या मानांकनामध्ये रवींद्र जडेजा दुसºया स्थानी आहे, तर मिशेल स्टार्क १० व्या स्थानी पोहोचला आहे. आर. आश्विनने चौथ्या स्थानावर नऊ मानांकन गुणांची आघाडी घेतली आहे. तो अव्वल स्थानावरअसलेल्या जेम्स अँडरसनच्या तुलनेत ४२ मानांकन गुणांनी पिछाडीवर आहे. भुवनेश्वर कुमार २८ व्या व ईशांत शर्मा ३० व्या स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या मानांकनामध्ये आश्विन तिसºया स्थानी, तर बांगलादेशचा शाकिब-अल-हसन अव्वल स्थानी कायम आहे.(वृत्तसंस्था)कोहली ११ गुणांनी पिछाडीवरपुजाराने २२ मानांकन गुणांची कमाई करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम ८८८ मानांकन गुणांसह चौथ्या स्थानावरून दुसºया स्थानी दाखल झाला. कर्णधार कोहली त्याच्या तुलनेत ११ गुणांनी पिछाडीवर असून पाचव्या स्थानी आहे. कोहलीने ६२ व्या कसोटीत पाचवे द्विशतक झळकावले. त्याच्या खात्यावर ८७७ मानांकन गुणांची नोंद आहे.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ