दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही, आता युद्ध करायलाच हवे, अशी भूमिका भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने घेतली आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीत संतापाची लाट उसळली. पाकिस्तानला जशासतसे उत्तर देण्याचा आग्रह भारतीय धरू लागले. आता चर्चा नाही, तर युद्धच हवं, अशी सर्वांची तीव्र भावना आहे. गंभीरही त्याला अपवाद नाही. त्याने तर भाजपा सरकारने पाकिस्तानशी चर्चा करू नका, त्यांना त्यांच्या भाषेतच समजवा, अशी मागणी केली. गंभीरच्या या तीव्र नाराजीवर पाकिस्तानचा फलंदाज शाहिद आफ्रिदीला विचारण्यात आले.
शहिद कुटुंबियांच्या मदतीसाठी विदर्भाकडून इनामाची रक्कमसलग दुसऱ्या वर्षी रणजीपाठोपाठ इराणी करंडक जिंकण्याचा मान विदर्भाच्या संघाने पटकावला आहे. विदर्भाचा संघ फक्त इतक्यावरच थांबला नाही, तर या विजयानंतर मिळालेली इनामाची रक्कम त्यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचे जाहीर केले आहे. गुरवारी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. यामध्ये भारताच्या ४० जवानांना शहीद व्हावे लागले होते. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीदांच्या कुटुंबियांना मदत करायचे विदर्भाच्या संघाने ठरवले आहे. त्यानुसार त्यांनी ही घोषणा केली आहे.