पुणे - येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं किवींचा सहा विकेटनं पराभव करत तीन सामन्याच्या मालिकेत बरोबरी केली आहे. शिखर धवन(68) आणि दिनेश कार्तिक (नाबाद 64) यांच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर भारतानं न्यूझीलंडनं दिलेलं 231 धावांचे आव्हान भारतानं 46 व्या षटकांत पार केलं.
गहुंजे येतील मैदानावर गुरूवारी रंगलेल्या सामन्यात भारताने न्युझीलंडला ५० षटकांत ९ बाद २३० धावात रोखले. न्युझीलंडच्या या आव्हानाला प्रत्यु्ततर देतांना भारताची सुरूवात फारशी दमदार झाली नाही. रोहित शर्मा डावाच्या चौथ्या षटकांतील टीम साउदीच्या तिसऱ्या चेंडूवर रोहित शर्माने कॉलिन मुन्रोकडे झेल दिला. भारताची धावसंख्या २२ होती. रोहित बाद होताच कोहली येणार म्हणून पुणेकर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. साउदीने एका बाउन्सरने कोहलीचे स्वागत केले. मात्र पुढच्याच चेंडूवर चौकार लगावत त्याने आक्रमणातील हवा काढून घेतली. दहा षटकांनंतर भारताने ६४ धावा केल्या होत्या. कोहलीने एका बाजुने फटकेबाजी सुरु केली. मात्र कॉलिन डी ग्राण्ड होम याने कोहलीला यष्टीमागे झेलबाद केले. कोहली बाद होताच मैदानात एकच शांतता पसरली. कोहली बाद झाल्यावर भारताची धावगती कमी झाली.
त्यानंतर पुढच्या दहा षटकांत भारताने ४६ धावा केल्या. पहिल्या ५० धावा ४७ चेंडूत केल्यानंतर पुढच्या ५० धावा करण्यासाठी ७३ चेंडू घेतले. शिखर धवन याने ६३ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. या दोघांनी काही वेळ संघाचा डाव सावरला. दोघांनी ६६ धावांची भागिदारी केली. त्यानंतर शिखर धवन वैयक्तिक ६८ धावांवर बाद झाला. ८४ चेंडूमध्ये केलेल्या खेळी त्याने पाच चौकार आणिदोन षटकार लगावले. अॅडम मिल्नेच्या गोलंदाजीवर त्याने रॉस टेलरकडे सोपा झेल दिला. हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांनी संघाचा डाव सांभाळला. कार्तिकने ७६ चेंडूत आपले अऱ्धशतक साजरे केले. संघ विजयाच्या समीप आलेला असताना सेंटनरच्या चेंडूवर पांड्या फसला आणि झेलबाद झाला. पांड्या आणि दिनेश या दोघांनी ६५ चेंडूत ५६ धावांची भागिदारी केली. पांड्या बाद झाल्यावर धोनी आणि कार्तिक यांनी फटकेबाजी करून संघाला विजय मिळवून दिला.तत्पुर्वी न्युझीलंडचे फलंदाज पुन्हा एकदा सूर गवसलेल्या भारतीय गोलंदाजी समोर टिकाव धरु शकले नाही. न्युझीलंडच्या हेन्री निकोल्स आणि डी ग्राण्डहोम वगळता एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही. भुवनेश्वर कुमारने गुप्टीलला धोनीकरवी झेलबाद केले. त्यानंतर लगेचच भुवनेश्वरने कॉलीन मुन्रोला तंबूत परत पाठवले. वानखेडेवर शतक झळकावणारा रॉस टेलरला या सामन्यात हार्दिक पांड्याने बाद केले. टेलरने ३३ चेंडूत २१ धावा केल्या. कुलदीप यादव एवजी संधी मिळालेल्या अक्षर पटेलने टॉम लॅ..मला पायचीत पकडत संघासमोरचा मोठा धोका दूर सारला.
लॅथम आणि निकोल्स तसेच निकोल्स आणि ग्राण्डहोम यांनी उपयुक् भागिदाऱ्या करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. निकोल्स आणि ग्राण्डहोम यांनी ४७ धावांची भागिदारी केली. निकोल्सने ६२ चेंडूत ४२ धावा केल्या. तर मिशेल सेंटनर याने २९ धावांचे योगदान दिले.४३ व्या षटकांत युजवेंऱद चहल याने सलग दोन चेंडूंवर ग्राण्ड होम आणि मिल्ने यांना बाद केले. डी ग्राण्डहोम याने ४० चेंडूतच ४१ धावातडकावल्या. त्यावेळी संघाची धावसंख्या ८ बाद १८८ अशी होती. सेंटनर आणि साउदी यांनी फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. साऊदी याने २२ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या. एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना कानपूर येथे होणार आहे.