संतोष मोरबाळे ।अहमदाबाद : प्रो कबड्डीमध्ये प्रथमच समाविष्ट करण्यात आलेल्या इंटर झोन गटातील पहिला सामना पुणेरी पलटनने १७- ३४ अशा गुण फरकाने जिंकला. त्यांनी बंगाल वॉरियर्स वर १७ गुणांनी मात करत इंटर झोन प्रकारात आपले खाते उघडले.येथे आजपासून प्रो कबड्डीच्या इंटर झोन गटातील सामन्यास प्रारंभ झाला. पुणेरी पलटन व बंगाल वॉरियर्स या दोन्ही संघांनी आपआपल्या गटात ११ गुण घेतले आहेत. पुर्वार्धात बंगालकडून मनिंदर सिंंग व रणसिंग यांनी, तर पुणेरी पलटनकडून रोहित चौधरी व संदीप नरवाल यांनी यशस्वी चढाया केल्या. मात्र बंगालच्या खेळाडूंकडून काही तांत्रिक चुका झाल्या. याचा फायदा पुण्याच्या संघाने घेतला. संदीप नरवालने बंगालचे दोन खेळाडू बाद करत बंगालवर पहिला लोण चढवत सहा गुणांची निर्णायक आघाडी घेतली.त्यांनतर ही आघाडी वाढवण्याचे काम पुण्याचा कर्णधार दीपक हुडा याने केले. संदीप नरवालने आज चढाईतही गुण मिळवले. गिरिश एर्नाक याने काही चमकदार पकडी केल्या व संघाची आघाडी कमी होऊ दिली नाही. बंगालचा मुख्य खेळाडू मनिंदर सिंग व कर्णधार सुरजित सिंग हे दोघे बहुतांश वेळ मैदानाबाहेर होते. याचा परिणाम त्यांच्या खेळावर झाला. पुर्वार्ध संपला तेंव्हा १७-१० गुणांसह पुण्याने बंगालवर सात गुणांची आघाडी घेतली होती.उत्तरार्धातही बंगालचा खेळ विस्कळीत झाला. मनिंदर सिंगला चढाईत यश मिळत नव्हते तर अन्य खेळाडू वारंवार चुका करत होते. दरम्यान पुणेरी पलटणने धर्मराजला मैदानात उतरवत आपला बचाव आणखी भक्कम केला. राजेश मोंडल याने एका चढाईत दोन खेळाडू बाद करत बंगालवर दुसरा लोण चढवला. या लोणमुळे पुण्याने तेरागुणांची निर्णायक आघाडी घेतली. गुरुनाथ चमकदार कामगिरी करत सहा तर संदीप नरवालने ७गुण मिळवले. गुरुनाथने मोक्याच्यावेळी बंगालच्या आक्रमकांना पकडत त्यांच्या आव्हानातली हवा काढली.>गुजरात फॉर्च्युनजायंट्सचा सलग चौथा विजयगुजरात फॉर्च्युनजायंट्सने घरच्या मैदानावर विजयी घोडदौड कायम राखताना त्यांनी बंगळूरु बुल्सवर २७-२४ अशी तीन गुणांनी मात केली. घरच्या मैदानावर सलग तीन सामने जिंकल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या गुजरात संघाने बंगळूरुचा कर्णधार रोहितकुमारची पकड करत चांगली सरुवात केली. मात्र बंगळुरुने नियोजनबद्ध खेळ करत गुजरातवर पहिला लोण चढवला. यामुळे बंगळूरुकडे आठ गुणांची आघाडी झाली. मध्यंतराला १४ -९ अशी बंगळूरुकडे आघाडी होती. बंगळूरुकडे ९ धावांची आघाडी असाताना गुजरातने गुजरातने महेंद्र राजपूतला मैदानात उतरवले. त्यांनी बंगळूरुचा कर्णधार रोहितला मैदानाबाहेरच ठेवले. बंगळूरुच्या विस्कळीत झालेल्या खेळाचा फायदा घेत त्यांच्यावर लोण चढवून २१-२१ अशी बरोबरीत साधली. त्यानंतर सचिनने ही आघाडी वाढवत चार गुणांची केली. सामना अत्यंत रोमहर्षक स्थितीत असताना बंगळुरुने सचिनची पकड करत पुन्हा २४-२४ अशी बरोबरी साधली. मात्र रोहित मैदानाबाहेर असल्याचा फटका बंगळूरुला बसला. महेंद्रने अखेरच्या क्षणी गुजरात संघाला निर्णायकआघाडी मिळवून देत सामना फिरवला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पुणेकरांनी पाडला बंगालचा फडशा
पुणेकरांनी पाडला बंगालचा फडशा
प्रो कबड्डीमध्ये प्रथमच समाविष्ट करण्यात आलेल्या इंटर झोन गटातील पहिला सामना पुणेरी पलटनने १७- ३४ अशा गुण फरकाने जिंकला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 3:57 AM