इंदूर : सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत बुधवारी मेघालयाचा कर्णधार पुनीत बिश्त याने गोलंदाजांवर कहर केला. त्याने मिझोरमविरुद्ध सामन्यात ५१ चेंडूत नाबाद १४६ धावा ठोकल्या. त्याने सहा चौकार आणि १७ षटकार मारले. त्यानंतर २३ चेंडूंवर त्याच्या १२६ धावा होत्या.
टी-२० मध्ये चौथ्या स्थानावर येऊन सर्वाधिक धावा ठोकण्याच्या विश्वविक्रमाची त्याच्या नावावर नोंद झाली आहे. बिश्तच्या झंझावाताच्या बळावर मेघालयाने ६ गड्यांच्या मोबदल्यात २३० धावा केल्या. मिझोरम संघ ९ गड्यांच्या मोबदल्यात १०० पर्यंतच मजल गाठू शकला. यष्टिरक्षक- फलंदाजाची टी-२० त ही मोठी खेळी आहे. त्याने लोकेश राहुलला मागे टाकले. राहुलने आयपीएलमध्ये किंग्स पंजाबकडून नाबाद १३१ धावा केल्या होत्या. बिश्तने आज ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. टी-२० त सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज म्हणून तो गेलच्या पंक्तीत बसला. गेलने २०१३ ला पुणे वॉरिअर्सविरुद्ध १७ षटकार मारले होते.
विक्रमी वाटचाल... बिश्टी त-२०त चौथ्या क्रमांकावर येत सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज ठरला. श्रीलंकेचा दशुन चनाकाचा विक्रम मोडला. चनाकाने २०१६ ला नाबाद १३१ धावा केल्या होत्या.