VIDEO: पंजाब क्रिकेट असोसिएशनने गाणं वाजवून किंग कोहलीचं केलं स्वागत, व्हिडीओ होतोय व्हायरल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील टी-२० मालिकेला २० सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 08:02 PM2022-09-18T20:02:24+5:302022-09-18T20:05:20+5:30

whatsapp join usJoin us
 Punjab Cricket Association gives musical touch to Virat Kohli's arrival in Mohali, watch video  | VIDEO: पंजाब क्रिकेट असोसिएशनने गाणं वाजवून किंग कोहलीचं केलं स्वागत, व्हिडीओ होतोय व्हायरल

VIDEO: पंजाब क्रिकेट असोसिएशनने गाणं वाजवून किंग कोहलीचं केलं स्वागत, व्हिडीओ होतोय व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामधील टी-२० मालिकेला २० सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू मोहाली येथे दाखल होत आहेत. रविवारी भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली मोहालीत दाखल झाला असता त्याने सर्वांचे लक्ष वेधले. जेव्हा विराट तिथे दाखल झाला तेव्हा पंजाब क्रिकेट असोसिएशनने गाणं वाजवून किंग कोहलीचे स्वागत केल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. आशिया चषकात किंग कोहलीने शानदार फलंदाजी करून विश्वचषकासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, आशिया चषकापूर्वी किंग कोहली खराब फॉर्मचा सामना करत होता. मात्र अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात किंग कोहलीने त्याचे वैयक्तिक ७१ वे शतक झळकावून जोरदार कमबॅक केला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. विराट कोहली हा विश्वचषकासाठी आमचा तिसरा सलामीवीर म्हणून पर्याय आहे. संघाकडे पर्याय उपलब्ध असणे नेहमीच चांगले असते. तसेच आम्ही तिसरा सलामीवीर न घेतल्याने विराट उघडपणे ओपन करू शकतो, असे कर्णधार रोहित शर्माने म्हटले. 

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वेळापत्रक  - २० सप्टेंबर- मोहाली, २३ सप्टेंबर - नागपूर आणि २५ सप्टेंबर- हैदराबाद

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरूद्धची मालिका झाल्यानंतर टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दोन्हीही संघाविरूद्ध भारत ३-३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा शेवटचा सामना ४ ऑक्टोंबर रोजी होणार असून लगेचच रोहित सेना ऑस्ट्रेलियाला रवाना होणारा आहे. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या विश्वचषकापूर्वी कांगारूच्या संघाला भारतीय संघ आपल्या मायदेशात पराभवाची धूळ चारणार का हे पाहण्याजोगे असेल. 

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल,  भुवनेश्वर कुमार,  हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग. 

राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर. 

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
13 नोव्हेंबरला अंतिम सामना 

 

Web Title:  Punjab Cricket Association gives musical touch to Virat Kohli's arrival in Mohali, watch video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.