Join us  

गब्बर-प्रभसिमरनचा ‘हल्ला बोल’, एलिसचा दमदार मारा

पंजाबने राजस्थानला ५ धावांनी नमवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2023 6:36 AM

Open in App

गुवाहाटी : थरारक झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने केवळ ५ धावांनी बाजी मारत राजस्थान रॉयल्सचे तगडे आव्हान परतावले. यासह यंदाच्या आयपीएलमधील सलग दुसऱ्या विजयासह पंजाबने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. पंजाबने २० षटकांत ४ बाद १९७ धावा उभारल्या. यानंतर त्यांनी  राजस्थानला २० षटकांत ७ बाद १९२ धावांवर रोखले.

वेगवान गोलंदाज नॅथन एलिसचा भेदक मारा पंजाबसाठी महत्त्वाचा ठरला. त्याने ३० धावांत ४ बळी घेत पंजाबला वर्चस्व मिळवून दिले. राजस्थानच्या मधल्या फळीने सांघिक खेळ केला. कर्णधार संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर व इम्पॅक्ट खेळाडू ध्रुव जुरेल यांच्यामुळे राजस्थानच्या विजयाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. हेटमारयर-जुरेल यांनी सातव्या गड्यासाठी २६ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी करत सामन्यात रंग भरले. अखेरच्या षटकात हेटमायर धावबाद झाला आणि पंजाबने बाजी मारली.

त्याआधी,  कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग या सलामीवीरांनी राजस्थानच्या गोलंदाजांविरुद्ध जबरदस्त ‘हल्लाबोल’ करत पंजाबला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. दोघांनी पॉवर प्लेच्या ६ षटकांमध्येच ६३ धावांचा चोप दिला. दोघांनी ५८ चेंडूंत ९० धावांची सलामी देत पंजाबला शानदार सुरुवात करून दिली. अखेर दहाव्या षटकात जेसन होल्डरने प्रभसिमरनला बाद केले. जोस बटलरने सीमारेषेवरून धावत येत, अप्रतिम सूर मारत प्रभसिमरनचा झेल घेतला. यानंतर, लगेच भानुका राजपक्ष दुखापतग्रस्त झाल्याने मैदानाबाहेर गेला. यामुळे राजस्थान पुनरागमन करेल, असे वाटले; परंतु धवनने यंदाच्या सत्रातील पहिले अर्धशतक झळकावत संघाला भक्कम स्थितीत आणले.

स्कोअर कार्ड

पंजाब -  स्कोअर १९७/४   ओवर २०  एक्स्ट्रा १०

खेळाडू                                        धावा  चेंडू     4/6प्रभसिमरन झे. बटलर गो. होल्डर     ६०    ३४      ७/३   शिखर धवन नाबाद     ८६    ५६      ९/३  भानुका राजपक्षे निवृत्त     ०१    ०१      ०/०         जीतेश शर्मा झे. पराग गो. चहल     २७    १६      २/१   सिकंदर रझा त्रि. गो. अश्विन      ०१    ०२      ०/०   शाहरुख खान झे. बटलर गो. होल्डर     ११    १०      १/०   सॅम करन नाबाद     ०१    ०२      ०/०   

गोलंदाज    षटक    धावा     बळी     मेडनट्रेंट बोल्ट      ४    ३८     ०    ०आसिफ      ४    ५४     ०    ०अश्विन      ४    २५     १    ०    होल्डर      ४    २९     २    ०चहल           ४    ५०     १     ०

-------

राजस्थान  स्कोअर १९२/७   ओवर २०  एक्स्ट्रा १० 

खेळाडू                                   धावा  चेंडू     4/6जयस्वाल झे. शाॅर्ट गो. अर्शदीप    ११    ०८      १/१   अश्विन झे. धवन गो. अर्शदीप     ००    ०४      ०/०   बटलर झे. गो. एलिस     १९    ११      १/१         सॅमसन झे. शाॅर्ड गो. एलिस     ४२    २५      ५/१   पडीक्कल त्रि. गो. एलिस     २१    २६      १/०   पराग झे. शाहरूख गो. एलिस     २०    १२      १/२   हेटमायर धावबाद (शाहरूख)       ३६    १८      १/३जुरेल नाबाद     ३२     १५      ३/२होल्डर नाबाद      ०१    ०१      ०/०

गोलंदाज    षटक    धावा     बळी     मेडनकरन      ४    ४४     ०    ०अर्शदीप      ४    ४७     २    ०हरप्रीत      २    १५     ०    ०    एलिस      ४    ३०     ४    ०चहर      ४    ३१     ०     ०सिकंदर      २    २४     ०    ०

  • प्रभसिमरनने तुफानी आक्रमण करत राजस्थानला प्रचंड दडपणात आणले. त्याने ट्रेंट बोल्टसह सर्वच गोलंदाजांवर हल्ला चढवताना पंजाबच्या धावगतीला कमालीचा वेग दिला. त्याला मिळालेली लय बघता धवननेही प्रेक्षकाची भूमिका घेतली आणि प्रभसिमरनला जास्तीत जास्त स्ट्राइक देण्याचा प्रयत्न केला. प्रभसिमरनने राजस्थानच्या गोलंदाजांची लय बिघडवून टाकत त्यांना वर्चस्वाची संधी दिली नाही.
टॅग्स :आयपीएल २०२३शिखर धवनसंजू सॅमसनपंजाब किंग्सराजस्थान रॉयल्स
Open in App