PBKS vs CSK । चेन्नई : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील एकेचाळीसावा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर होत असलेला हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यातील विजयी संघ गुणतालिकेत देखील मोठी झेप घेईल. आताच्या घडीला चेन्नईचा संघ १० गुणांसह चौथ्या स्थानावर स्थित आहे. महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेततला आहे. खरं तर मागील काही सामन्यांमध्ये चाहत्यांना कॅप्टन कूल धोनीच्या फलंदाजीची झलक पाहायला मिळाली नाही.
दरम्यान, थालाची फलंदाजी पाहता यावी यासाठी पंजाब किंग्जच्या फ्रँचायझीने एक भन्नाट ट्विट करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. "५-६ लवकर विकेट्ससाठी प्रार्थना करत आहे, जेणेकरून आपण सर्व थालाची बॅटिंग पाहू शकू", अशा आशयाचे ट्विट पंजाबने केले आहे. चेन्नईची सलामी जोडी ऋतुराज गायकवाड आणि डेव्होन कॉनवे सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. अनेकदा या जोडीच्या मोठ्या खेळीमुळे धोनीच्या आगमनाआधीच सामना संपला आहे, त्यामुळे पंजाबचे हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
चेन्नईची प्रथम फलंदाजीआजच्या सामन्यासाठी महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करेल. आजचा सामना दिवसाचा असल्यामुळे गरमीचा फार प्रभाव पडेल म्हणून आम्ही प्रथम फलंदाजी करत असल्याचे धोनीने सांगितले. तर आम्ही देखील नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली असती असे पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"