मुंबई - ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्डकप स्पर्धा रंगात आली असतानाच आयपीएलमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएल २०२३ ची पूर्वतयारी करताना पांजाब किंग्सच्या संघाने आपला कर्णधार बदलला आहे. सोशल मीडियावर या संदर्भातील पोस्ट करून माहिती दिली आहे. पंजाब किंग्सनेआयपीएल २०२२ दरम्यानही आपला कर्णधार बदलला होता.
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी धडपडत असलेल्या पंजाब किंग्सच्या संघाने दरवर्षी कर्णधार बदलण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. आता पंजाब किंग्सने मयांक अग्रवाल याला कर्णधारपदावरून दूर केले आहे. त्याच्याऐवजी भारतीय संघातील अनुभवी सलामीवीर शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे. मयांक अग्रवालने २०२२ च्या हंगामात पंजाब किंग्सच्या संघाचं नेतृत्व केलं होतं.
शिखर धवन गेल्यावर्षीच पंजाब किंग्सच्या संघात दाखल झाला होता. आता तो या संघाचा कर्णधार बनला आहे. दरम्यान, टी-२० विश्वचषकानंतर होणाऱ्या भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यातील वनडे मालिकेसाठीही शिखर धवनकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
Web Title: Punjab Kings in IPL has changed its captain again, now Shikhar Dhawan will lead it
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.