- हर्षा भोगले लिहितात...
बटलरला बाद करण्याच्या पद्धतीवर सर्व जगाचे लक्ष लागले असताना किंग्स इलेव्हन पंजाबने जयपूरमधील लढतीनंतर थोडे आत्मपरीक्षण केले असेल. त्यांच्यासाठी ही कडवी लढत आहे, पण संघाचा सर्व थकवा गेल, मुजीब, अश्विन व सरफराज यांच्या फॉर्ममुळे दूर पळून गेला असेल.
विशेष अनुभव नसताना सरफराजची निवड करण्यात आल्यामुळे मला आश्चर्य वाटले आणि हे स्वीकारताना मला कुठली अडचण नाही. पण तो चांगल्या फॉर्मात असल्याचे दिसत आहे. तो स्मार्ट क्रिकेटपटू आहे. दुसऱ्या टोकावर गेल आक्रमक खेळत असल्यामुळे त्याला मदत मिळाली. गेलची खेळी निकालातील अंतर स्पष्ट करणारी ठरली. जोपर्यंत बटलर व रहाणे आणि त्यानंतर सॅमसन खेळपट्टीवर होते तोपर्यंत पंजाबची गोलंदाजी मर्यादित वाटत होती. सॅम कुरनला लवकरच सूर गवसेल. कारण आयपीएलमध्ये दाखल झाल्याबरोबरच सर्वोत्तम कामगिरी करणे सोपे नसते. दरम्यान, कुरनला लवकरच सूर गवसेल, अशी आशा आहे.
कारण पंजाब संघाच्या संतुलनामध्ये तो महत्त्वाचा खेळाडू आहे. कोलकाता नाईट रायडर्सची फलंदाजी मजबूत आहे. त्यांच्याविरुद्ध गोलंदाजीतील छोट्या उणिवा मोठ्या प्रमाणात उघड होऊ शकतात.
गोलंदाजीमध्ये कोलकाताच्याही अडचणी आहेत. त्यांच्याकडे गोलंदाजीचा भार वाहण्यासाठी सात गोलंदाज आहेत. खेळाडूंची निवड करताना दाखवलेल्या समजदारीमुळे हे घडले.
कोलकाता नाइट रायडर्स संघाची मजबूत फलंदाजी व फायर पॉवर बघता त्यांच्याविरुद्ध कुठलेही लक्ष्य निश्चित करणे कठीण जाईल. जर पंजाब संघाने ईडन गार्डन्सवर प्रथम फलंदाजी केली, तर त्यांना १८० पेक्षा अधिक धावा फटकवाव्या लागतील.
त्याचवेळी, चाहत्यांसाठी चांगली वार्ता म्हणजे ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल हे दोघेही खेळाडू फॉर्मात आहेत. कॅरेबियन खेळाडूंनी आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीची छाप सोडली आहे. या दोन्ही खेळाडूंनी पुन्हा अशीच कामगिरी केली तर मला आश्चर्य वाटणार नाही.
Web Title: Punjab will need to score more than 180 runs against Kolkata
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.