एक चेंडू राखून पंजाबने मिळवला रोमांचक विजय

लोकेश राहुलचे नाबाद अर्धशतक : सनरायझर्स हैदराबादचा ६ गड्यांनी पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 07:03 AM2019-04-09T07:03:12+5:302019-04-09T07:03:48+5:30

whatsapp join usJoin us
Punjab win by last ball | एक चेंडू राखून पंजाबने मिळवला रोमांचक विजय

एक चेंडू राखून पंजाबने मिळवला रोमांचक विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली : अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने रोमहर्षक विजय मिळवताना सनरायझर्स हैदराबादचा ६ गड्यांनी पराभव केला. अखेरच्या तीन षटकात हैदराबादने भेदक मारा करताना सामना रोमांचक स्थितीत आणला. परंतु, सलामीवीर लोकेश राहुलने अखेरपर्यंत नाबाद राहताना ७१ धावांचा तडाखा देत पंजाबच्या विजयावर शिक्का मारला. यासह पंजाबने ८ गुणांची नोंद करताना तिसऱ्या स्थानी झेप घेतली.


आयएस बिंद्रा स्टेडियमवर पंजाबने हैदराबादला २० षटकात ४ बाद १५० धावांत रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या सुरुवातीनंतरही पंजाबची घसरगुंडी झाली. मात्र राहुलच्या संयमी अर्धशतकामुळे त्यांनी एक चेंडू राखून रोमांचक विजय मिळवला. पंजाबने १९.५ षटकात ४ बाद १५१ धावा केल्या. अखेरच्या तीन षटकात पंजाबला १९ धावांची गरज असताना संदीप शर्माने १८व्या षटकात मयांक अग्रवाल व डेव्हिड मिल्लर यांना बाद करुन पंजाबची ३ बाद १३५ अशी अवस्था केली. यानंतर मोहम्मद नाबीने मनदीप सिंगला बाद करुन पंजाबवरील दबाव आणखी वाढवले. मात्र, राहुलने अतिरिक्त दडपण न घेता पंजाबच्या हातातील सामना निसटू दिला नाही. ख्रिस गेल (१६) झटपट परतल्यानंतर मयांकने ४३ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावा करुन राहुलसह दुसऱ्या गड्यासाठी ११४ धावांची निर्णायक भागीदारी केली.


तत्पूर्वी, पंजाबच्या नियंत्रित माºयापुढे हैदराबादला समाधानकारक मजल मारता आली. नाबाद राहिलेला सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ६२ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ७० धावा केल्याने हैदराबादने दीडशेचा पल्ला गाठला. वॉर्नरने पंजाबविरुद्ध सातव्यांदा अर्धशतक झळकावताना दुसऱ्यांदा एखाद्या संघाविरुद्ध सलग ७ अर्धशतक झळकावले. याआधी त्याने आरसीबीविरुद्धही २०१४-१६ दरम्यान सलग ७ अर्धशतके झळकावली होती.
किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या आघाडीच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखले. वॉर्नरवर अर्धशतक झळकावले खरे, मात्र त्याला नैसर्गिक खेळ करण्याची संधी मिळाली नाही. अष्टपैलू विजय शंकरने (२६) वॉर्नरला थोडीफार साथ देत हैदराबादच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र जॉनी बेयरस्टॉ (१), मोहम्मद नाबी (१२), मनिष पांड्ये (१९) अपयशी ठरल्याने हैदराबादला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही.
अखेरच्या काही चेंडूंत दीपक हूडाने फटकेबाजी करताना ३ चेंडूत २ चौकार व एका षटकारासह नाबाद १४ धावा केल्या. मुजीब उर रहमान, मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेताना हैदराबादला जखडवून ठेवले.

वॉर्नरचा धमाका
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध नेहमीच यशस्वी ठरणाºया डेव्हिड वॉर्नरने या संघाविरुद्ध सलग सातवे अर्धशतक झळकावले. या सामन्याआधी वॉर्नरने हैदराबादविरुद्ध ५८, ७१, ५९, ५२, ७०* आणि ५१ अशा खेळी केल्या होत्या. विशेष म्हणजे याआधी वॉर्नरने आरसीबीविरुद्धही सलग सात अर्धशतके झळकाविण्याचा पराक्रम केला आहे.

Web Title: Punjab win by last ball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.