चेन्नईला धक्का ,ब्राव्हो काही सामने खेळू शकणार नाही

दुखापतीतून सावरत असलेल्या वेस्ट इंडिजच्या या अनुभवी खेळाडूच्या अनुपस्थितीत तीन वेळचा चॅम्पियन सीएसके संघाने शनिवारी विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करताना गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच गडी राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 05:59 AM2020-09-21T05:59:43+5:302020-09-21T06:00:09+5:30

whatsapp join usJoin us
Pushing Chennai, Bravo will not be able to play some matches | चेन्नईला धक्का ,ब्राव्हो काही सामने खेळू शकणार नाही

चेन्नईला धक्का ,ब्राव्हो काही सामने खेळू शकणार नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अबूधाबी : संघाचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो इंडियन प्रीमिअर लीगच्या १३ व्या पर्वात आणखी काही सामने खेळू शकणार नाही, असे चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी स्पष्ट केले.
दुखापतीतून सावरत असलेल्या वेस्ट इंडिजच्या या अनुभवी खेळाडूच्या अनुपस्थितीत तीन वेळचा चॅम्पियन सीएसके संघाने शनिवारी विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करताना गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच गडी राखून विजय मिळवला.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना फ्लेमिंग म्हणाले,‘ कुरेनची कामगिरी शानदार झाली.’ कुरेनने प्रभावी मारा करताना ४ षटकांत २८ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला.


नाणेफेक जिंकली असती तर आम्हीसुद्ध प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य दिले असते, असे मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनने सांगितले. आॅस्ट्रेलियाचा हा वेगवान गोलंदाज म्हणाला,‘आमची प्रथम गोलंदाजी करण्याची इच्छा होती. रात्री उष्णतामानात फरक पडत असल्यामुळे दवाचा त्रास जाणवतो. त्यामुळे प्रथम गोलंदाजी करणे लाभदायक ठरते.’

ड्वेन काही सामने बाहेर राहील. कॅरेबियन लीग स्पर्धेदरम्यान अलीकडेच ब्राव्होला दुखापत झाली होती. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो फायनलमध्ये खेळला नव्हता. ब्राव्होच्या स्थानी खेळत असलेला इंग्लंडचा अष्टपैलू सॅम कुरेनने ६ चेंडूंमध्ये १८ धावांची खेळी करीत चेन्नईला लक्ष्य गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Web Title: Pushing Chennai, Bravo will not be able to play some matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.