भारतीय संघाला धक्का, दुखापतीमुळं 'हा' सलामीवीर पहिल्या सामन्यातून बाहेर

दक्षिण आफ्रिकेविरोधात सुरु होणाऱ्या दोन महिन्याच्या मोठ्या दौऱ्याला सुरुवात होण्याआधीच भारतीय खेळाडूला दुखपतीचं ग्रहण लागलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 03:26 PM2017-12-28T15:26:39+5:302017-12-28T16:05:13+5:30

whatsapp join usJoin us
Pushing on the Indian team, due to injury, the 'open' salute came out of the first match | भारतीय संघाला धक्का, दुखापतीमुळं 'हा' सलामीवीर पहिल्या सामन्यातून बाहेर

भारतीय संघाला धक्का, दुखापतीमुळं 'हा' सलामीवीर पहिल्या सामन्यातून बाहेर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - दक्षिण आफ्रिकेविरोधात सुरु होणाऱ्या दोन महिन्याच्या मोठ्या दौऱ्याआधीच भारतीय खेळाडूला दुखपतीचं ग्रहण लागलं आहे. भारताचा धाकड सलामीवीर फलंदाज शिखर धवन दुखपतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्याता आहे. 5 ते 9 जानेवारी दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे. मुंबईतून आज पहाटे 4 च्या विमानाने भारतीय संघ दुबईला रवाना झाला, तिथून ते दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत. 

शिखरच्या पायाला दुखापत झाल्यामुळे पहिल्या कसोटीमध्ये तो खेळण्याची शक्यता कमी आहे. भारतीय संघ रवाना झाला त्यावेळी शिखर लंगडत हॉटेलमध्ये जाताना दिसला होता. शिखरच्या डाव्या तळपायाला पट्ट्या बांधलेल्या होत्या. शिखरसोबत संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्डदेखील होते. 

माध्यमांच्या वृत्तानुसार, शिखरच्या पायाच्या दुखापतीची तपासणी सुरू आहे. फिजिओने निवड समितीला अद्याप कोणतेही रिपोर्ट दिलेले नाही. त्यामुळे शिखर दक्षिण आफ्रिकेला जात आहे. मात्र, तो पहिल्या कसोटीमध्ये खेळणार की नाही याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जर शिखर धवन पहिल्या कसोटीमध्ये खेळला नाही तर के एल राहुल सोबत मुरली विजयला सलामीला खेळण्याची संधी मिळेल.


असे आहे वेळापत्रक  -

कसोटी मालिका

  • पहिली कसोटी : 5 ते 9 जानेवारी 2018 
  • दुसरी कसोटी : 13 ते 17 जानेवारी 2018
  • तिसरी कसोटी : 24 ते 28 जानेवारी 2018

वन डे मालिका

  • पहिला वन डे सामना : 1 फेब्रुवारी
  • दुसरा वन डे सामना : 4 फेब्रुवारी
  • तिसरा वन डे सामना : 7 फेब्रुवारी
  • चौथा वन डे सामना : 10 फेब्रुवारी
  • पाचवा वन डे सामना : 13 फेब्रुवारी
  • सहावा वन डे सामना : 16 फेब्रुवारी

टी ट्वेण्टी मालिका

  • पहिला टी 20 सामना : 18 फेब्रुवारी
  • दुसरा टी 20 सामना : 21 फेब्रुवारी
  • तिसरा टी 20 सामना : 24 फेब्रुवारी 
     

Web Title: Pushing on the Indian team, due to injury, the 'open' salute came out of the first match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.