न्यूझीलंड संघानं ICC World Test Championship स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावल्यानंतर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील दुसरा प्रतिस्पर्धी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतून ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाही या शर्यतीत आहे, परंतु त्यांनी दक्षिण आफ्रिका दौरा ( ३ कसोटी मालिका) स्थगित करण्याचा निर्णय घेतला अन् त्यांनाही भारत-इंग्लंड मालिकेवरच अवलंबून राहावं लागत आहे. आता इंग्लंडनं पहिल्या कसोटीत २२७ धावांनी विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयामुळे इंग्लंडनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात ( ICC World Test Championship Standing) अव्वल स्थान पटकावले आहे.
टीम इंडियाला धक्क्यांवर धक्के; २२ वर्षानंतर चेन्नईत पराभव अन् गमावले जागतिक कसोटीतील अव्वल स्थान!
कसं असेल अंतिम सामन्याचं गणित
भारताला क्वालिफाय होण्यासाठी
- 2-1 असा विजय
- 3-1 असा विजय
इंग्लंडला क्वालिफाय होण्यसाठी
- ३-० असा विजय
- ३-१ असा विजय
- ४-० असा विजय
ऑस्ट्रेलिया होऊ शकते क्वालिफाय
- इंग्लंडनं मालिका १-० नं जिंकल्यास
- इंग्लंडनं मालिका २-०नं जिंकल्यास
- इंग्लंडनं मालिका २-१नं जिंकल्यास
- भारत-इंग्लंड मालिका १-१ बरोबरीत सुटल्यास
- भारत-इंग्लंड मालिका २-२ बरोबरीत सुटल्यास