T20 World Cup, NZ vs AFG : अफगाणिस्तानचे नशीब चमकले, न्यूझीलंडविरुद्ध गुण कमावला; Group 1 मध्ये आतापासूनच चुरस सुरू झाली

Qualification scenarios of Grop 1 in T20 World Cup : ऑस्ट्रेलियातील लहरी वातावरणाचा फटका काय असतो याची प्रचिती आज इंग्लंडला आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 04:10 PM2022-10-26T16:10:30+5:302022-10-26T16:11:01+5:30

whatsapp join usJoin us
Qualification scenarios of Grop 1 in T20 World Cup : New Zealand Vs Afghanistan has been abandoned due to rain at the MCG, Both sides take a point each. | T20 World Cup, NZ vs AFG : अफगाणिस्तानचे नशीब चमकले, न्यूझीलंडविरुद्ध गुण कमावला; Group 1 मध्ये आतापासूनच चुरस सुरू झाली

T20 World Cup, NZ vs AFG : अफगाणिस्तानचे नशीब चमकले, न्यूझीलंडविरुद्ध गुण कमावला; Group 1 मध्ये आतापासूनच चुरस सुरू झाली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Qualification scenarios of Grop 1 in T20 World Cup : ऑस्ट्रेलियातील लहरी वातावरणाचा फटका काय असतो याची प्रचिती आज इंग्लंडला आली. आयर्लंडविरुद्धचा मेलबर्नवरील सामना केवळ ५ धावांच्या फरकाने त्यांना गमवावा लागला. डकवर्थ लुईस प्रणालीने आयर्लंडला विजयी घोषित करण्यात आले. यापाठोपाठ मेलबर्नवर होणारा न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. न्यूझीलंडने पहिल्याच सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियावर दणदणतीत विजय मिळवला होता आणि आजही ते सहज जिंकतील याची खात्री होती. पण, पावसाने त्यांच्याकडून एक गुण हिरावून घेतला अन् तो अफगाणिस्ताच्या पदरात टाकला. 

पाऊस आला धावून, इंग्लंड गेला वाहून! ५ धावा कमी केल्या अन् आयर्लंडने विजय मिळवला 


 

आजच्या दोन्ही निकालांमुळे ग्रुप १ची चुरस अधिक वाढली आहे. न्यूझीलंडचा संघ ३ गुण व +४.४५० नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे. श्रीलंका, इंग्लंड, आयर्लंड व ऑस्ट्रेलिया यांचेही प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. अफगाणिस्तानच्या खात्यात १ गुण जमा झाला. ग्रुप १ मधील सर्व संघांचे प्रत्येकी दोन सामने झाले आहेत आणि न्यूझीलंड हा एकमेव अपराजित संघ आहे. आता या संघांना प्रत्येकी ३ सामने खेळायचे आहेत आणि जो हे तीनही सामने जिंकेल तो या गटातून उपांत्य फेरीत प्रवेश करेल.



न्यूझीलंडला उर्वरित तीन सामन्यातं श्रीलंका, इंग्लंड व आयर्लंड यांचा सामना करावा लागणार आहे. यापैकी दोन सामने जिंकले तरी त्यांच्या खात्यात ७ गुण होतील आणि ग्रुप १ मधून दुसऱ्या क्रमांकावरून त्यांना उपांत्य फेरीत जाता येईल. पण, दोन हरले तर किवींचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. श्रीलंकेसमोर न्यूझीलंड, अफगाणिस्ता व इंग्लंड असे आव्हान आहे आणि त्यांना या तीनही लढती जिंकाव्या लागतील. इंग्लंडचा मार्ग मात्र खडतर आहे आणि त्यांना न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका या तगड्या संघांचा सामना करावा लागणार आहे. 


यजमान ऑस्ट्रेलियासमोर इंग्लंड सोडल्यास आयर्लंड व अफगाणिस्तान हे दोन तुलनेने कमी आव्हानात्मक संघ आहेत. मात्र, त्यांना तीनही सामने जिंकावे लागणार आहेत, कारण त्यांचा नेट रन रेट खूप कमी आहे. अफगाणिस्तानचे चान्स फार कमीच आहेत, परंतु ते उलटफेर करून इतरांना मदत करू शकतात. आयर्लंडला तीन सामने जिंकावे लागतील . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Qualification scenarios of Grop 1 in T20 World Cup : New Zealand Vs Afghanistan has been abandoned due to rain at the MCG, Both sides take a point each.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.