Qualifier 1, MI vs DC Latest News & Live Score : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ आज ठरेल. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) हे दोन संघ Qualifier 1 सामन्यात भिडत आहेत. MIला अखेरच्या साखळी सामन्यात पराभवाचा तोंड पहावं लागलं, तर DCनं अखेरचा सामना जिंकून प्ले ऑफसाठीचं स्थान पक्कं केलं. आर अश्विननं उत्तम गोलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला धक्के दिले, परंतु त्यांच्या धावांच्या वेगावर DCच्या गोलंदाजांना लगाम लावता आला नाही. MIनं मोठा पल्ला गाठला. त्याच्या दडपणाखाली DCचे फलंदाज आले अन् ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराह यांनी त्यांची कोंडी करून आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.
क्विंटन डी'कॉकनं पहिल्याच षटकात १५ धावा चोपून मुंबईला दमदार सुरूवात करून दिली. पण, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरनं दुसऱ्याच षटकात आर अश्विनला गोलंदाजीला आणले. त्यानं पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला ( ०) पायचीत करून माघारी पाठवले. सूर्यकुमार यादव व क्विंटन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून MIची गाडी रुळावर आणली. क्विंटन डी'कॉक ४० धावांवर माघारी परतला. सूर्यकुमारनं ३८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ५१ धावा केल्या.
किरॉन पोलार्डही ( ०) अश्विनचा सोपा शिकार ठरला. अश्विननं ४ षटकांत २९ धावांत तीन विकेट्स घेतल्या. मुंबईला धक्के बसूनही त्यांच्या धावांचा वेग काही कमी झाला नाही. इशान किशन व हार्दिक पांड्या यांनी षटकारांची आतषबाजी करताना मुंबईला मोठा पल्ला गाठून दिला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ताबडतोड २३ चेंडूंत 60* धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं ५ बाद 200 धावा चोपल्या. हार्दिकनं १४ चेंडूंत ५ षटकारांसह नाबाद ३७ धावा केल्या, इशाननं ३० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या.
मुंबईनं उभ्या केलेल्या तगड्या आव्हानाचा भार दिल्लीचे आघाडीचे फलंदाज पेलवू शकले नाही. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणे बाद झाले. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या षटकात शिखऱ धवनला बाद केले. दिल्लीचे आघाडीचे तीनही फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. कर्णधार श्रेयस अय्यरला ( १२) बाद करून बुमराहनं दिल्लीची अवस्था ४ बाद २० धावा अशी दयनीय केली. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच ० धावांवर ३ फलंदाज माघारी परतण्याचा पराक्रम केला आणि तो मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या नावावर नोंदवला गेला.
पाहा दिल्लीच्या विकेट्सWeb Title: Qualifier 1, MI vs DC : First time in the history of the IPL that a team has been reduced to 0 for 3, Watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.