Qualifier 1, MI vs DC Latest News & Live Score : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ आज ठरेल. रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड शून्यावर बाद होऊनही मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)च्या अन्य फलंदाजांनी धमाकेदार खेळ करताना संघाला २०० धावांचा पल्ला गाठून दिला. या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals)चे फलंदाज दबावाखाली दिसले. त्यात ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराह यांनी त्यांना पहिल्या चार षटकांतच जबरदस्त धक्के दिले आणि दिल्लीची अवस्था ४ बाद २० अशी दयनीय केली. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या लकी आजीबाई दिसल्यानं नेटिझन्सची उत्सुकता ताणली.
क्विंटन डी'कॉकनं पहिल्याच षटकात १५ धावा चोपून मुंबईला दमदार सुरूवात करून दिली. पण, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरनं दुसऱ्याच षटकात आर अश्विनला गोलंदाजीला आणले. त्यानं पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला ( ०) पायचीत करून माघारी पाठवले. सूर्यकुमार यादव व क्विंटन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून MIची गाडी रुळावर आणली. क्विंटन डी'कॉक ४० धावांवर माघारी परतला. सूर्यकुमारनं ३८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ५१ धावा केल्या.किरॉन पोलार्डही ( ०) अश्विनचा सोपा शिकार ठरला. अश्विननं ४ षटकांत २९ धावांत तीन विकेट्स घेतल्या.
मुंबईला धक्के बसूनही त्यांच्या धावांचा वेग काही कमी झाला नाही. इशान किशन व हार्दिक पांड्या यांनी षटकारांची आतषबाजी करताना मुंबईला मोठा पल्ला गाठून दिला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ताबडतोड २३ चेंडूंत 60* धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं ५ बाद 200 धावा चोपल्या. हार्दिकनं १४ चेंडूंत ५ षटकारांसह नाबाद ३७ धावा केल्या, इशाननं ३० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या.
मुंबईनं उभ्या केलेल्या तगड्या आव्हानाचा भार दिल्लीचे आघाडीचे फलंदाज पेलवू शकले नाही. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणे बाद झाले. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या षटकात शिखऱ धवनला बाद केले. दिल्लीचे आघाडीचे तीनही फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. कर्णधार श्रेयस अय्यरला ( १२) बाद करून बुमराहनं दिल्लीची अवस्था ४ बाद २० धावा अशी दयनीय केली. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच ० धावांवर ३ फलंदाज माघारी परतण्याचा पराक्रम केला आणि तो मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या नावावर नोंदवला गेला.
त्या आजीबाई कोण?
२०१७च्या मुंबई इंडियन्स आणि पुणे सुपरजायंट्स यांच्यातल्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा प्रार्थना करताना दिसल्या होत्या. पुणे संघाला पाच चेंडूंत ७ धावांची गरज होती आणि तेव्हा आजीबाई डोळे मिटून प्रार्थना करत होत्या. त्यांची प्रार्थना देवाने ऐकली आणि मुंबईनं एका धावेनं थरारक सामना जिंकला. सोशल मीडियावर मुंबईच्या विजयासह त्या आजीबाईंचीच चर्चा रंगली. पण, त्या कोण आहेत, हे कुणालाच माहित नव्हते. अभिषेक बच्चन यानं त्याबाबचे गुपित सर्वांना सांगितले, त्या आजीबाई म्हणजे मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांच्या आई पुर्णिमा दलाल आहेत. त्या आज पुन्हा मैदानावर दिसल्यानं नेटिझन्सच्या आनंदाला उधाण आले.
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
Web Title: Qualifier 1, MI vs DC : Mumbai Indians’ lucky charm ‘Prayer Aunty’ is back in the stands; Twitter can’t keep calm
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.