Qualifier 1, MI vs DC Latest News & Live Score : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ आज ठरेल. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) हे दोन संघ Qualifier 1 सामन्यात भिडत आहेत. MIला अखेरच्या साखळी सामन्यात पराभवाचा तोंड पहावं लागलं, तर DCनं अखेरचा सामना जिंकून प्ले ऑफसाठीचं स्थान पक्कं केलं. आर अश्विननं उत्तम गोलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला धक्के दिले, परंतु त्यांच्या धावांच्या वेगावर DCच्या गोलंदाजांना लगाम लावता आला नाही. MIनं तगडं आव्हान उभं केलं.
क्विंटन डी'कॉकनं पहिल्याच षटकात १५ धावा चोपून मुंबईला दमदार सुरूवात करून दिली. पण, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरनं दुसऱ्याच षटकात आर अश्विनला गोलंदाजीला आणले. त्यानं पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला ( ०) पायचीत करून माघारी पाठवले. या कामगिरीसह रोहितनं आयपीएलमध्ये सर्वाधिक १३वेळा भोपळ्यावर बाद होण्याच्या हरभजन सिंग व पार्थिव पटेल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
सूर्यकुमार यादव व क्विंटन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून MIची गाडी रुळावर आणली. पण, अश्विनच्या पेटाऱ्यात काही वेगळंच होतं, त्यानं MIच्या दुसऱ्या सलामीवीरालाही मागे पाठवले. क्विंटन डी'कॉक ४० धावांवर माघारी परतला. फॉर्मात असलेल्या सूर्यकुमारची बॅट आजही तळपली. त्यानं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, पुढच्याच चेंडूवर षटकार खेचण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. अॅनरिच नॉर्ट्झेनं MIला धक्का देताना सूर्यकुमारला ३८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ५१ धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आयपीएलमध्ये १०० सामने व २०००+ धावा करणारा सूर्यकुमार पहिला फलंदाज ठरला.
यंदाच्या आयपीएलमधील हे चौथे अर्धशतक आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक ४६१ धावांचा विक्रमही त्यानं नावावर केला. किरॉन पोलार्डही ( ०) अश्विनचा सोपा शिकार ठरला. अश्विननं ४ षटकांत २९ धावांत तीन विकेट्स घेतल्या. मुंबईला धक्के बसूनही त्यांच्या धावांचा वेग काही कमी झाला नाही. इशान किशन व हार्दिक पांड्या यांनी षटकारांची आतषबाजी करताना मुंबईला मोठा पल्ला गाठून दिला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ताबडतोड २३ चेंडूंत 60* धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं ५ बाद 200 धावा चोपल्या. हार्दिकनं १४ चेंडूंत ५ षटकारांसह नाबाद ३७ धावा केल्या, इशाननं ३० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या.
Web Title: Qualifier 1, MI vs DC: Mumbai Indians post 200 in 20 overs, Ishan Kishan 55* and Hardik Pandya 37*
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.