T20 World Cup 2024, Pat Cummins - ICC स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा किती आहे, हे सांगायची गरज नाही. ऑस्ट्रेलियाच्या नावावर सर्वाधिक १० आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम आहे आणि त्यानंतर भारत व वेस्ट इंडिज ( ५) यांचा क्रम येतो. ऑस्ट्रेलियाने वन डे वर्ल्ड कप ६ ( 1987, 1999, 2003, 2007, 2015, 2023), ट्वेंटी-२० वर्ल्ड कप १ ( 2021), जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा १ (2021-23) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २ (2006, 2009) अशा १० आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. आता जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. मागच्या वर्षी भारताता वन डे वर्ल्ड कप जिंकणारा कर्णधार पॅट कमिन्स ( Pat Cummins) याने मोठा दावा केला आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला तसे फारसे यश मिळालेले नाही. पण, सध्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. ट्रॅव्हिस हेडची फटकेबाजी प्रतिस्पर्धींना धडकी भरवणारी आहे. तर पॅट कमिन्सने त्याच्या नेतृत्वाचा मीदास टच सनरायझर्स हैदराबादला दिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली SRH ने १० सामन्यांत ६ विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपदाच्या दावेदारांमध्ये अनेक माजी खेळाडूंच्या मुखी ऑस्ट्रेलिया हे कॉमन नाव आहे. तोच प्रश्न कमिन्सला जेव्हा विचारण्यात आला, तेव्हा त्यानेही ऑस्ट्रेलियाचे नाव घेतले. पण, उर्वरित ३ संघ त्याने सांगितले नाही. मात्र, त्याचं उत्तर ऑस्ट्रेलियन्सची आयसीसी स्पर्धेसाठी असणारी मानसिकता प्रतित करते.
मुलाखतकार - वर्ल्ड कप स्पर्धेत अव्वल ४ संघ कोण असतील?पॅट कमिन्स - डेफिनिटली ऑस्ट्रेलिया, अन्य तीन तुम्ही निवडामुलाखतकार - तुम्ही कोणते तीन संघ निवडाल?पॅट कमिन्स- मला पर्वा नाही, तुम्ही तुम्हाला जे हवेत ते निवडा
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन अर्गर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा.