- अयाझ मेमन
भारतीय क्रिकेटविश्वात मोठी खळबळ माजली आहे ती अंबाती रायडूची भारतीय संघात निवड न झाल्याने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी रायडूची भारताच्या एकदिवसीय संघात निवड झाली होती. पण तंदुरुस्तीच्या ‘यो-यो’ चाचणीत अपयशी ठरल्याने त्याला संघाबाहेर जावे लागले. ही चाचणी सर्वांसाठी अनिवार्य असून यामध्ये रायडूला अपेक्षित गुण मिळवण्यात यश आले नाही. यामुळेच त्याला संघातील स्थान गमवावे लागले. त्याची जागा आता सुरेश रैनाला मिळाली आहे.
एक-दीड वर्षाआधी रैनादेखील यो-यो चाचणीमध्ये अपयशी ठरला होता. यामुळे तोही संघाबाहेर होता. आता ही ‘यो-यो’ चाचणी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, ते जाणून घेऊया. ही चाचणी एक शारीरिक तंदुरुस्तीचे मापदंड आहे, जी सर्वच खेळाडूंसाठी अनिवार्य आहे. जे कोणी खेळाडू या चाचणीमध्ये ठरविलेले गुण मिळविण्यात अपयशी ठरतात, त्यांना संघात स्थान मिळत नाही. संघव्यवस्थापनाने सुरू केलेल्या या नियमावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. हेच मापदंड सर्व खेळाडूंना लागू होतात का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. जसे की, तुम्ही फलंदाज आहात आणि तुमची खासियत आहे की, कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घ खेळी खेळण्याची क्षमता आहे. सहा तास किंवा दीड तास खेळू शकता. अशा परिस्थितीमध्ये यो-यो चाचणीच तुम्हाला संघात स्थान मिळवून देईल का?
जर यो-यो चाचणी उत्तीर्ण केली, पण कसोटी क्रिकेट खेळण्याची तुमच्यात क्षमता नसेल, तर ही
चाचणी कामाची आहे का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. सध्या तंदुरुस्तीचा स्तर अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. ज्या
वेळी मी क्रिकेटची सुरुवात केली होती, तेव्हा तंदुरुस्ती निकष
खूप हलके होते. मैदानाच्या २-३
फेºया मारल्या तरी खूप व्हायचे
तेव्हा. पण आज टी२०, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये तंदुरुस्ती कमी असेल, तर कामगिरीवर त्याचा विपरीत परिणाम होतो, यात वाद नाही.
पण असे असले तरी, क्रिकेट हा खेळ कौशल्याचा खेळ आहे. यामध्ये ताकदीचा तितकासा वापर होत नाही. त्यातही यो-यो चाचणी असावी का? आणि जर ही चाचणी आहे, तर त्याचे मापदंड काय असावे यावर प्रश्न उभे राहत आहेत. माजी खेळाडूंच्या मते यो-यो चाचणी लक्षात घेतानाच खेळाडूंची सर्व प्रकारातली कामगिरीही लक्षात घेतली गेली पाहिजे. त्यामुळे या चाचणीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही चाचणी भारतीय क्रिकेटसाठी किती महत्त्वाची आहे, किंवा संघबांधणीसाठी यो - यो चाचणी किती महत्त्वपूर्ण आहे,
यावर मी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह संघव्यवस्थापनाशीही चर्चा करण्याचा प्रयत्न करेल. ही चर्चा झाल्यावर आणि त्यांचा दृष्टीकोन जाणून घेतल्यानंतरच या चाचणीचे महत्त्व आपल्याला कळेल.
(संपादकीय सल्लागार)
Web Title: Questions are being raised on the Yo-Yo test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.