नवी मुंबई : द. आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर क्विंटन डिकॉक २०१५पासून आयपीएलमध्ये आहे. बुधवारी केकेआरविरुद्ध त्याने लीगमध्ये पहिले शतक ठोकले. शतक ठोकताच डिकॉकने बॅटवर ठोसा मारला आणि जमिनीवर गुडघ्यावर बसून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित क्रिकेटप्रेमींनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. त्यानेही बॅट उंचावून टाळ्यांचा स्वीकार केला.
शतकी खेळीमागील कारण सांगत क्विंटन म्हणाला, ‘गेल्या काही सामन्यांत ज्याप्रकारे बाद होत होतो, त्यामुळे मी निराश झालो. त्यामुळे नेमकं काय करावं, हे कळत नव्हते. मी निराशेतून बाहेर पडत माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत केले. माझ्या खेळीतून निराशा बाहेर पडली. त्यावेळी मी काय विचार करत होतो, हे मला माहिती नाही. पण आता मी समाधानी आहे.’
डिकॉक - राहुल जोडीने दमदार खेळी करत २० षटकात बिनबाद २१० धावांची भागीदारी केली. आयपीएलमध्ये डिकॉकची ही सर्वोच्च खेळी ठरली.
Web Title: quinton de kock said disappointment come out of the century now i am satisfied
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.