R Ashwin Hindi Statement Video Viral : भारतीय संघाचा माजी फिरकीपटू आर. अश्विन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून सातत्याने या ना त्या कारणामुळे चर्चेत आहे. वेगवेगळ्या मुद्यावर रोखठोक मत मांडणाऱ्या आर. अश्विननं कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण देताना हिंदी भाषेसंदर्भातील वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. महाविद्यालयातील एका कार्यक्रमा दरम्यान त्याने केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. जाणून घेऊयात तो नेमकं काय म्हणाला अन् त्याचे क्तव्य का ठरू शकतं कळीचा मुद्दा यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
सोशल मीडियावर अश्विनचा जो व्हिडिओ व्हायरल होताय तो एका महाविद्यालयातील कार्यक्रमातील आहे. या समारंभामध्ये भाषण देण्याआधी आर. अश्विन विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत ऐकायला आवडेल? यासंदर्भातील प्रश्न विचारताना दिसते. यावेळी अश्विननं इंग्रजीला पसंती देणारे किती लोक आहेत त्यांनी हातवर करा, असा प्रश्न विद्यार्थांना केला. यावेळी त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. भाषण हिंदीमध्ये ऐकायला किती विद्यार्थी उत्सुक आहेत या प्रश्ना वेळीही त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. यावर अश्विन याने हिंदी राष्ट्रभाषा नाही तर कामकाजाची अधिकृत भाषा आहे, असे म्हटले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो.
सोशल मीडियावर रंगली चर्चा
आर. अश्विनच्या हिंदी भाषेसंदर्भातील वक्तव्यावर सोशल मीडियावर वादविवाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. काही वापरकर्ते आर अश्विन याने तथ्य मांडल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे काहीजण अश्विनने उगाच वाद निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Web Title: R Ashwin Controversial Statement Hindi Not National Language Know What The Former Indian Spinner Said College Function
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.