R Ashwin, IPL 2022 Auction : भारताचा फिरकीपटू आर अश्विन याला राजस्थान रॉयल्सने आपल्या ताफ्यात दाखल केल्यानंतर सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल झाले. त्याला कारणही तसेच होते. राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२२साठी सजू सॅमसन ( १४ कोटी), जोस बटलर ( १० कोटी), यशस्वी जैस्वाल ( ४ कोटी) यांना कायम राखले. त्यामुळेच अश्विन RRच्या ताफ्यात येताच नेटिझन्स सुसाट सुटले. २०१९च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातल्या सामन्यात अश्विन व जोस यांच्यात मंकडिंगवरून वाद झाला होता. आता हे दोन्ही खेळाडू एकाच संघाकडून खेळणार आहेत. त्यात आर अश्विनने इंग्लंडच्या खेळाडूसाठी खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.
नेमकं काय झालं होतं?
आर अश्विन पंजाब किंग्सकडून खेळत होता आणि जोस राजस्थानचा सदस्य होता. पंजाबच्या १८५ धावांचा पाठलाग करताना राजस्थानने २ बाद १०८ धावा केल्या होत्या आणि जोस ६९ धावांवर खेळत होता. तेव्हा अश्विननं त्याला मंकडिंग करून धावबाद केले आणि त्यावरून मोठा वाद झाला होता. राजस्थानने हा सामना १४ धावांनी गमावला होता.
अश्विनने काय ट्विट केले?
राजस्थान रॉयल्सकडून खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. २०१८मध्येही त्यांनी मला त्यांच्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु त्यांना यश आले नाही. यावेळेस त्यांनी मला संघात दाखल करून घेतलेच.. मी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल. युझवेंद्र चहलसह गोलंदाजी करण्यासाठीही उत्सुक आहे. सर्वात महत्त्वाचे जोससोबत ड्रेसिंग रुम शेअर करणार आहे....