U-19 World Cup: IPL च्या हंगामात सामना रंगात असताना पंजाबकडून खेळत असलेल्या रविचंद्रन अश्विनने राजस्थान संघाच्या जोस बटलरला मंकडिंग करत बाद केलं होतं. क्रिकेट चाहत्यांना ही विकेट आणि त्यानंतर झालेला वाद लक्षात नाही असं होणं खूपच कठीण आहे. असाच एक प्रकार सध्या सुरू असलेल्या १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत झाला. एका गोलंदाजाने मंकडिंग करत नॉन स्ट्राईकवरील फलंदाजाला बाद केलं. घडलेल्या प्रकारावरून अपेक्षित असलेला वाद झालाच. पण त्यातही काही चाहत्यांनी अश्विनची आठवण काढत मजेशीर कमेंट्स केल्या. पाहा मंकडिंगचा व्हिडीओ-
मंकडिंगचा हा व्हिडीओ ICC ने स्वत:च्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला. या व्हिडीओवर प्रचंड कमेंट्स आल्या. नॉन स्ट्राईकचा फलंदाज क्रीजच्या बाहेर असताना असं करणं योग्य की अयोग्य हा वादही रंगला. पण काही चाहत्यांना मात्र अश्विन आठवल्यावाचून राहिला नाही. एका चाहत्याने कमेंट केली की अश्विन म्हणत असेल की हा माझाच शिष्य आहे, तर दुसऱ्याने कमेंट केली की अरे हा तर आर अश्विन Lite आहे.
मंकडिंग करून फलंदाजाला बाद करणं हे क्रिकेटच्या नियमाला धरून असलं तरी योग्य की अयोग्य यावरूही चर्चा रंगली. भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज युवराज सिंग याने गोलंदाजाचा हा प्रयत्न केविलवाणा असल्याचं म्हटलं. पण अनेकांनी 'नियम हे सर्वांसाठी सारखेच असतात', असं म्हणत मंकडिंगचं जोरदार समर्थन केलं.
Web Title: R Ashwin Lite Comedy Comments by Cricket Fans after Bowler mankading non striker batter in Uganda vs Papua New Guinea in U 19 World Cup watch video on Instagram
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.