जगभरात कोरोना व्हायरसचं संकट घोंगावत आहे. त्यामुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णांची संख्या ही सर्वांच्या मनात भीती निर्माण करणारी आहे. त्यात सोशल मीडिया, प्रसार माध्यमं यांच्याकडून येणाऱ्या नकारात्मक बातम्यांनी हे संकट दूर होईल की नाही, ही शंका मनात घर करू लागली आहे. या चिंतेच्या वातावरणार भारताचा फिरकीपटू आर अश्विननं एक सकारात्मक बातमी सांगितली आहे. ही बातमी तुम्हाला नक्कीच दिलासा देईल, याची खात्री आहे.
Breaking : ऑस्ट्रेलियन संघाकडून टीम इंडियाला मोठा धक्का
जगभरात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 33 लाख 10, 039 रुग्ण सापडले असून 2 लाख 34, 143 जणांना आपले प्राण गमवावे लागले. ही आकडेवारी चिंता निर्माण करणारी नक्कीच आहे. पण, अश्विननं सांगितली आकडेवारी ही जिद्दीनं लढण्याचा हुरुप निर्माण करणारी आहे. अश्विननं दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कोरोना व्हायरसचा मुकाबला करून 10 लाख लोकं बरी झाली आहेत. आतापर्यंत 10 लाख 43, 245 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
अश्विननं ट्विट केलं की,''जगात कोरोना व्हायरसचे संकट आले आहे आणि आपल्याला रोज नकारात्मक बातम्या ऐकायला मिळत आहेत. पण, मी एक सांगू इच्छितो की या व्हायरसवर मात करणाऱ्यांची संख्या ही 10 लाखांवर गेली आहे. शुभ प्रभात.''
Maharashtra day : 'तो' खास फोटो अन् सचिन तेंडुलकरने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
Sania Mirza ला मिळाली आनंदाची बातमी; म्हणाली, हा क्षण माझ्यासाठी खास!
Bad News : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर क्रिकेटची मोठी लीग 2020मध्ये होणार नाही