Join us  

ना सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विनचे मोठे विधान.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 1:04 PM

Open in App

r ashwin on jasprit bumrah : कसोटी क्रिकेटमधील अव्वल क्रमाकांचा गोलंदाज आर अश्विन. अलीकडेच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने अष्टपैलू खेळी केली. संघ अडचणीत असताना बॅटने कमाल करताना त्याने अप्रतिम शतक झळकावले. मग जसप्रीत बुमराहने चार बळी घेत बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम केला. दुसऱ्या डावात भारताकडून रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनी शतके झळकावली. मग गोलंदाजीत अश्विनने सहा बळी घेऊन आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. अश्विनच्या खेळीचे सर्वत्र कौतुक होत असताना त्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे तोंडभरुन कौतुक केले. 

जसप्रीत बुमराह हा एक वेगवान गोलंदाज आहे... एवढ्या उन्हात देखील तो १४५ च्या गतीने गोलंदाजी करतो. तो खूपच मेहनती आहे. बुमराह म्हणजे भारतीय क्रिकेटमधील एक रत्नच. लोकांनी जसा कोहिनूर हिरा घेतला तसाच आजच्या घडीला भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा जसप्रीत बुमराह आहे. तो जो बोलत आहे त्याला बोलूद्या..., अशा शब्दांत अश्विनने बुमराहच्या खेळीला दाद दिली. तो त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलत होता. 

अश्विनची ऐतिहासिक कामगिरी दरम्यान, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अश्विनची ओळख आहे. त्याने कसोटीमध्ये आतापर्यंत ५२२ बळी, ३४२२ धावा, ६ शतके, दहावेळा सामनावीरचा पुरस्कार आणि दहावेळा मालिकावीरचा पुरस्कार जिंकला आहे. सक्रिय खेळाडूंमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा सामानवीरचा पुरस्कार जिंकणाऱ्यांच्या यादीत अश्विनने रवींद्र जडेजा आणि विराट कोहली यांची बरोबरी साधली. या तिघांनीही दहावेळा हा पुरस्कार जिंकला आहे. अश्विनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ५२२ बळींची नोंद आहे. तर त्याने वन डे आणि ट्वेंटी-२० मध्ये अनुक्रमे १५६ आणि ७२ असे बळी घेतले आहेत. यासह अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७५० बळी पूर्ण केले. अश्विन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज आहे. त्याने सर्वाधिक ३७वेळा पाच बळी पटकावण्याची किमया साधली. सर्वात जलद २५०, ३०० आणि ३५० बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज म्हणूनही त्याची ख्याती आहे.

टॅग्स :आर अश्विनजसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघ