Indian team for the T20 World Cup : इंग्लंड दौऱ्यावर चार कसोटी सामने बाकावर बसून पाहणाऱ्या आर अश्विनला ( R Ashwin) थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान मिळाल्यानं सर्वांना धक्काच बसला आहे. आर अश्विनच्या कामगिरीवर कधीच कुणाला शंका नव्हती आणि नसणार, परंतु चार वर्ष ट्वेंटी-२० संघाबाहेर बसलेल्या अश्विनची निवड ही सर्वांना बुचकळ्यात टाकणारी आहे. ९ जुलै २०१७ वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टन येथे अश्विन अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळला होता, त्याच दौऱ्यावर तो अखेरचा वन डे सामना खेळला. पण, चार वर्षांनंतर थेट मर्यादित षटकांच्या अन् तेही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठीच्या संघात निवड झाल्याचा अश्विनलाही आश्चर्य वाटले. त्यानं टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर सुविचार पोस्ट केला अन् त्याला झालेला आनंद व्यक्त केला.
टीम इंडियानं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची बुधवारी घोषणा केली. चार फलंदाज, दोन यष्टिरक्षक-फलंदाज, १ जलदगती अष्टपैलू, २ फिरकी अष्टपैलू, ३ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज असा हा संघ आहे, तर राखीव खेळाडूंमध्ये एक फलंदाज व दोन जलदगती गोलंदाजांचा समावेश आहे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) टीम इंडियाला मार्गदर्शन करणार आहे. तो मेंटर म्हणून भारतीय संघासोबत असणार आहे.
अश्विननं काय पोस्ट केली?
२०१७ : हा सुविचार मी माझ्या घरातील भींतीवर लिहिण्यापूर्वी हजारोवेळा डायरीमध्ये लिहिला असेल. हा सुविचार वाचून जेव्हा तो आत्मसात करतो, तेव्हा तुम्हाला अधिक ताकद मिळते. ( 2017: I wrote this quote down a million times in my diary before putting this up on the wall! Quotes that we read and admire have more power when we internalise them and apply in life.) आता तरी आनंद आणि कृतज्ञता या दोन शब्दांत मी हा क्षण व्यक्त करू शकतो.
भारतीय संघ ( India T20 WorldCup squad) - आघाडीची फळी - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल; मधली फळी - सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन; अष्टपैलू खेळाडू - हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल; फिरकीपटू - राहुल चहर, आर अश्विन, वरुण चक्रवर्थी; जलदगती गोलंदाज - जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, दीपक चहर; संघात स्थान न मिळालेले खेळाडू - पृथ्वी शॉ, शिखर धवन, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर.
Web Title: R Ashwin, who played his last T20I for India in 2017 remembers his old quote after being selected in India's T20 World Cup squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.