Indian team for the T20 World Cup : इंग्लंड दौऱ्यावर चार कसोटी सामने बाकावर बसून पाहणाऱ्या आर अश्विनला ( R Ashwin) थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान मिळाल्यानं सर्वांना धक्काच बसला आहे. आर अश्विनच्या कामगिरीवर कधीच कुणाला शंका नव्हती आणि नसणार, परंतु चार वर्ष ट्वेंटी-२० संघाबाहेर बसलेल्या अश्विनची निवड ही सर्वांना बुचकळ्यात टाकणारी आहे. ९ जुलै २०१७ वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टन येथे अश्विन अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळला होता, त्याच दौऱ्यावर तो अखेरचा वन डे सामना खेळला. पण, चार वर्षांनंतर थेट मर्यादित षटकांच्या अन् तेही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठीच्या संघात निवड झाल्याचा अश्विनलाही आश्चर्य वाटले. त्यानं टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर सुविचार पोस्ट केला अन् त्याला झालेला आनंद व्यक्त केला.
T20 World Cup : भारतीय संघात अजूनही केला जाऊ शकतो बदल, IPL 2021मधील कामगिरीची घेतली जाणार दखल!
टीम इंडियानं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची बुधवारी घोषणा केली. चार फलंदाज, दोन यष्टिरक्षक-फलंदाज, १ जलदगती अष्टपैलू, २ फिरकी अष्टपैलू, ३ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज असा हा संघ आहे, तर राखीव खेळाडूंमध्ये एक फलंदाज व दोन जलदगती गोलंदाजांचा समावेश आहे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) टीम इंडियाला मार्गदर्शन करणार आहे. तो मेंटर म्हणून भारतीय संघासोबत असणार आहे.
अश्विननं काय पोस्ट केली?२०१७ : हा सुविचार मी माझ्या घरातील भींतीवर लिहिण्यापूर्वी हजारोवेळा डायरीमध्ये लिहिला असेल. हा सुविचार वाचून जेव्हा तो आत्मसात करतो, तेव्हा तुम्हाला अधिक ताकद मिळते. ( 2017: I wrote this quote down a million times in my diary before putting this up on the wall! Quotes that we read and admire have more power when we internalise them and apply in life.) आता तरी आनंद आणि कृतज्ञता या दोन शब्दांत मी हा क्षण व्यक्त करू शकतो.