क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंड क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात रचिन रवींद्र आणि मेली केर यांनी सर्वोच्च सन्मान पटकावला. २४ वर्षीय रवींद्र हा 'सर रिचर्ड हॅडली' पदक जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला, तर केरने सलग दुसऱ्या वर्षी डेबी हॉकले पदक जिंकला. याव्यतिरिक्त केरने वन डे आणि ट्वेंटी-२० प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार देखील जिंकले. रचीन रवींद्र आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. डेवॉन कॉनवे याने दुखापतीमुळे माघार घेतल्याने तो ऋतुराज गायकवाड सोबत सलामीला आलेलाही दिसू शकतो.
नुकतेच ३२वे कसोटी शतक झळकावणाऱ्या केन विल्यमसनला वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून निवडण्यात आले. डॅरिल मिशेलने वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष वन डे खेळाडू, तर मिचेल सँटनरने सर्वोत्तम ट्वेंटी-२० पुरस्कार जिंकला. रवींद्रने २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ५७८ धावा केल्या. त्याने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २४० धावा करून यशाची पुनरावृत्ती केली आणि न्यूझीलंडच्या पहिल्या-वहिल्या कसोटी मालिकेत विरोधी संघावर विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
केन विलियम्सनने मागील वर्षभर कसोटी क्रिकेट गाजवले. त्याने ६ सामन्यांत ५६च्या सरासरीने ६१९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावात त्याने ( ११८ व १०९) शतक झळकावले होते आणि असा पराक्रम करणारा तो न्यूझीलंडचा पाचवा खेळाडू ठरला होता. त्याने आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करून ३२वे कसोटी शतक पूर्ण केले आणि हा टप्पा ओलांडणारा तो जलद फलंदाज ठरला. शिवाय त्याने सलग ७ कसोटींत शतक झळकावण्याचा पराक्रम केला. आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघातही त्याची निवड झाली होती.
Web Title: Rachin Ravindra wins the Richard Hadlee Medal, He's the youngest men's player in history to win the award
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.