पुणे : अजिंक्य रहाणे सध्या फॉर्ममध्ये नसला तरी दक्षिण आफ्रिका दौ-याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघासाठी हा चिंतेचा विषय नसल्याचे मत माजी कर्णधार सौरभ गांगुलीने सोमवारी पुण्यात व्यक्त केले.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर बंगाल आणि दिल्ली संघांमध्ये रणजी चषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य लढत सुरू आहे. बंगाल क्रिकेट संघटनेचा (कॅ ब) अध्यक्ष असलेला गांगुली आपल्या संघाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पुण्यात आला आहे. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना तो म्हणाला, ‘‘अजिंक्य हा दर्जेदार खेळाडू आहे. मला विचाराल तर, त्याचा फॉर्म हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय नाही. अजिंक्यसह विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय आफ्रिकेत खेळले आहेत. याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.’’
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्य साफ अपयशी ठरला होता. या संघाविरुद्ध ५ डावांत त्याला केवळ १७ धावा करता आल्या. असे असले तरी भारतीय उपखंडाबाहेर तो यशस्वी फलंदाज ठरला आहे. यामुळे दक्षिण आफ्रिका दौºयासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.
सध्याच्या भारतीय गोलदाजांवर गांगुली चांगलाच खुश आहे. आफ्रिकेच्या भूमीवर भारतीय गोलंदाजांचे यश पाहण्यास तो उत्सुक आहे.
आफ्रिका दौºयात मुरली विजयचा सलामीचा साथीदार म्हूणन गांगुलीने शिखर धवनला पसंती दिली. शिखर चांगल्या फॉर्मात आहे. विजयने लंकेविरूद्ध आश्वासक कामगिरी केली आहे. रोहित शर्माने अलीकडे मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. एकंदरीत विचार करता भारताचा संघ चांगला आहे. मात्र, आफ्रिकेचे आव्हान सोपे नसेल. तेथे यश मिळविण्यासाठी आपली फलंदाजी बहरणे आवश्यक आहे. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यास गोलंदाज विजयासाठी आवश्यक बळी मिळवू शकतात, असा आशावाद गांगुलीने व्यक्त केला.
उमेश यादवचा वेग जबरदस्त आहे. भुवनेश्वर चांगल्या फॉर्मात आहे. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीतील क्षमतेबाबत काहींना शंका असली तरी संधी दिल्याशिवाय त्याची उपयोगिता सिद्ध होणार नाही. ५ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये सुरू होणाºया पहिल्या कसोटीत त्याला संधी मिळाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.
- सौरभ गांगुली
Web Title: Rahane's form is not a matter of concern, batting must be big for South Africa success: Sourav Ganguly
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.