Join us  

राहुल द्रविडला 'या' खेळाडूवर वाटतो सर्वात जास्त विश्वास

भारतरत्न सचिन तेंडुलकरवर आपल्याला सर्वाधिक विश्वास आहे, असे मत भारताचा महान क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 12:57 PM

Open in App

नवी दिल्ली - भारतरत्न सचिन तेंडुलकरवर आपल्याला सर्वाधिक विश्वास आहे, असे मत भारताचा महान क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केले. सर्वोत्तम फलंदाज म्हणून तू कोणाची निवड करशील या प्रश्नावर त्याने त्वरित सचिनचे नाव घेतले. Espncricinfo ला दिलेल्या मुलाखतीत द्रविड म्हणाला की, गुणवत्ता आणि महानता यात सचिन आघाडीवर आहे. तो सर्वोत्तम खेळाडू आहे आणि त्याच्यासोबत मी खेळलो आहे. त्यामुळे मी त्याची निवड करेन.दी वॉल म्हणून ओळखल्या जाणा-या द्रविडने 164 कसोटीत 13288 धावा केल्या आहेत. भारतीय संघातील भरवशाचा खेळाडू म्हणून द्रविड ओळखला जातो. त्यामुळे संघ अडचणीत असताना क्रिकेटप्रेमींना द्रविडचीच आठवण येते. मात्र द्रविडने अशा परिस्थितीत सचिनची निवड केली आहे. आयसीसीच्या हॉल ऑफमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आणि प्रशिक्षक म्हणून भारताच्या 19 वर्षांखालील संघाला विश्वचषक जिंकून देणा-या द्रविडने कारकिर्दीतली सर्वात हास्यास्पद स्लेजिंग कोणती होती हेही यावेळी सांगितले. 2001च्या कोलकाता कसोटीत त्याने व्ही व्ही एस लक्ष्मणसोबत 376 धावांची विक्रमी भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाचा तोंडचा घास पळवला होता. त्या सामन्यातील एक किस्सा द्रविडने सांगितला. तो म्हणाला, कोलकाता कसोटीत जेव्हा मी मैदानावर उतरलो त्यावेळी मला पहिल्या कसोटीत तू तिस-या क्रमांकाला फलंदाजीला आलेलास आणि आता सहाव्या क्रमांकावर आला आहेस. मालिका संपेपर्यंत तू 12व्या क्रमांकावर जाशील, अशी स्लेजिंग माझ्यासोबत करण्यात आली होती. ती मला खूप हास्यास्पद वाटली होती. 

टॅग्स :राहूल द्रविडसचिन तेंडूलकरक्रिकेटक्रीडा