राहुल द्रविड होऊ शकतो मालामाल, IPL संघात मिळू शकते या दिग्गजाची जागा; ऑफर जाणून थक्क व्हाल!

राहुल द्रवीडच्या परिश्रमाच्या बळावर भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकला. आता भारताला चॅम्पियन बनवल्यानंतर राहुल द्रविड मालामाल होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 08:52 PM2024-07-09T20:52:29+5:302024-07-09T20:53:36+5:30

whatsapp join usJoin us
Rahul dravid big offer for kkr mentor in place of gautam gambhir you will be surprised to know the offer! | राहुल द्रविड होऊ शकतो मालामाल, IPL संघात मिळू शकते या दिग्गजाची जागा; ऑफर जाणून थक्क व्हाल!

राहुल द्रविड होऊ शकतो मालामाल, IPL संघात मिळू शकते या दिग्गजाची जागा; ऑफर जाणून थक्क व्हाल!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राहुल द्रवीडच्या परिश्रमाच्या बळावर भारतीय संघाने 13 वर्षांपासून सुरू असलेला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. भारताने टी-20 विश्वचषक जिंकला. आता भारताला चॅम्पियन बनवल्यानंतर राहुल द्रविड मालामाल होऊ शकतो. माध्यमांतील वृत्तांनुसार, काही आयपीएल फ्रेंचायझींचे त्याच्याकडे लक्ष आहे. मात्र, केकेआर रेसमध्ये सर्वात पुढे आहे.

गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती -
राहुल द्रविडनंतर भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपद कोण सांभाळणार याचे उत्तर अखेर मिळाले आहे. माजी क्रिकेटपटू आणि २००७ आणि २०११ च्या टीम इंडियाच्या विश्वविजेतेपदांमध्ये मोलाची भूमिका बजावणारा फलंदाज गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गौतम गंभीयच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीची आज औपचारिक घोषणा केली. भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर राहुल द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या जबादारीतून मुक्त झाला होता. गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने दोन आयपीएल जिंकले आहेत. यानंतर जेव्हा 2024 मध्ये गंभीर केकेआरमध्ये परतला तेव्हा या संघाने पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले.

राहुल द्रविडच्या शोधात केकेआर -
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला आहे. आता आयपीएल फ्रँचायझींच्या चॅम्पियन प्रशिक्षकाकडे नजरा आहेत. न्यूज18 च्या वृत्तानुसार, केकेआरने राहुल द्रविडला मेंटर होण्यासाठी मोठी ऑफर दिली आहे. भारतीय संघात द्रविडला वर्षाला १२ कोटी रुपये मिळत होते. मात्र, केकेआर राहुल द्रविडला याहूनही अधिक सॅलरी देण्यास तयार आहे. KKR शिवाय इतर 3 संघानीही राहुल द्रविडला ऑफर दिली आहे.

गौतम गंभीर परत आल्याने केकेआरचे चाहते अत्यत आनंदात  होते. गंभीरही त्यांच्या अपेक्षांवर पूर्णपण खरा उतरला. मात्र आता गंभीरची जागा कोण घेणार? हे जाणण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

 

Web Title: Rahul dravid big offer for kkr mentor in place of gautam gambhir you will be surprised to know the offer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.