नव दिल्ली : कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमात हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारण्याच्या ओघात राहुल आणि पांड्या यांनी महिलांबद्दल विवादास्पद वाक्य केले. यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. पण हे निलंबन त्यांनी मागेही घेतले. त्यामुळे पंड्या आता न्यूझीलंडच्या दौऱ्यामध्ये खेळत आहे. पण दुसरीकडे लोकेशची बाजू घेण्यासाठी भारताचा माजी महान फलंदाज आणि युवा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड मैदानात उतरला आहे.
“भारतीय संघाने विश्वचषकाचा विचार करायला हवी. इंग्लंडमधील खेळपट्ट्या या पाटा असतील. त्यामुळे विश्वचषकात चांगल्या धावा होऊ शकतात. मी जेव्हा युवा संघाबरोबर गेलो होतो, तेव्हा आम्ही प्रत्येक सामन्यात जवळपास तिनशे धावा करत होते. त्यामुळे विश्वचषकासाठी संघात लोकेश राहुलला संधी द्यायला हवी. सध्या तो चांगल्या फॉर्मात नसला तरी त्याच्याकडे चांगली गुणवत्ता आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये भारतीय संघासाठी तो उपयोगी पडू शकतो,” असे द्रविडने म्हटले आहे.
राहुल आणि पांड्यावरील वाढता रोष लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) पांड्या व राहुल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि 24 तासांच्या आत उत्तर देण्यास सांगितले. पांड्याने लगेचच बीसीसीआयच्या नोटीसीला उत्तर दिलं. त्यानं त्या विधानाबद्दल बीसीसीआयची मनापासून माफी मागितली होती. त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी या दोघांवरील निलंबन मागे घेण्यात यावे, अशी विनंती प्रशासकीय समितीला केली होती. त्यानंतर प्रशासकीय समितीने त्यांच्यावरील बंदी उठवली होती.
काय म्हणाल्या होत्या डायना एडुल्जीक्रिकेटपटू आणि बॉलिवूड हे नातं काही नवीन नाही. मात्र, आतापर्यंत क्रिकेटपटूंनी यात योग्य तो समन्वय राखला होता आणि आपण देशाचं प्रतिनिधित्व करतो, याची जाण त्यांना होती. अशा प्रकारचं विधान हे स्वाकारण्यासारखे नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. बिशनसिंग बेदी यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूनेही 70च्या दशकात असे विधान केलं होतं आणि त्यासाठी त्यांना एका सामन्याची बंदीही घालण्यात आली होती,'' असे एडुल्जी यांनी इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.